HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश

नवी दिल्ली | ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत आज (६ एप्रिल) काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपच्या स्थापना दिवशीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.  काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाळ आणि रणदीप सुरजेवाला यांच्या उपस्थितीत केला काँग्रेस पक्षात प्रेवश केला आहे. “मी जड अत:करणाने भाजप सोडत आहे. काँग्रेस पक्षात प्रवेश करताना खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी व्यक्त केले मनोगत.” काँग्रेस शत्रुघ्न यांना पटना साहिब येथून लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचा माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

यापूर्वी सिन्हा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. शत्रुघ्न सिन्हा यांनी विरोधाकंच्या व्यासपीठावरून गेल्या काही दिवसांपासून भाजपवर टीका केल्यामुळे शत्रुघ्न सिन्हा यांनी लोकसभेचा पत्ता कापण्यात आला आहे. भाजपने पटना साहिब येथून सिन्हा यांच्या ऐवजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांना उमेदवारी दिली आहे. शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पूनम सिन्हा लखनौ लोकसभा जागेवरून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या विरोधात निवडणूक लढविणार आहेत.

 

Related posts

शिवसेना हा नितिमत्ता संपलेला पक्ष, नारायण राणेंची घणाघाती टीका

News Desk

अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपचे बाबासाहेब वाकळे

News Desk

फोटोसेशनवरून राहुल गांधींची मोदींवर टिका

News Desk