HW News Marathi
राजकारण

विधान परिषद निवडणुकीत अशी आहे मतसंख्या….

मुंबई | विधानपरिषदेता आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. यात ६ पैकी ५ जागांचा आज निकाल जाहीर झाला आहे. यात भाजप २, शिवसेना २ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला १ जागा मिळाल्या आहेत.

विधान परिषद निवडणुकीचे निकाल खालीलप्रमाणे

  • अमरावतीत भाजपचा काँग्रेसला दे धक्का…

विधान परिषद निवडणुकीत भाजपचे प्रवीण पोटे यांना ४५८ मते मिळवून विजयी झाले आहेत. काँग्रेसचे अनिल माधोगढीया यांना केवळ १७ मते पडलीत. भाजपने ही जागा आपल्याकडे राखण्यात यश आले आहे. अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक मतमोजणीला सकाळी सुरुवात झाली.

  • परभणी-हिंगोलीत शिवसेनेचा विजय….

परभणी-हिंगोली विधान परिषद मतदार संघातून शिवसेनेचे विप्लव बाजोरिया यांना २५६ मतांनी विजयी झाले.. काँग्रेसचे उमेदवार सुरेश देशमुख यांचा २२१ मते पराभव झाला. शिवसेनेचे विप्लव बाजोरिया यांचा विजय ३५ मतांनी विजय झाला.

  • नाशिकमध्येही भगवाच! शिवसेनेचे नरेंद्र दराडे विजयी….

विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील शिवसेना उमेदवार नरेंद्र दराडे यांचा ४१२ मतेंनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे शिवाजी सहाणे यांचा २१९ मतांनी पराभव झाला. नरेंद्र दराडे यांना पाडण्याचे विरोधकांचे सारे प्रयत्न हाणून पाडत शिवसेनेवरील विश्वास कायम असल्याचे या निवडणुकीत दाखवून दिले आहे. यावेळी दराडे यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली होती.

  • कोकणात राष्ट्रवादीने बाजी मारली

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग राष्ट्रवादीचे अनिकेत सुनील तटकरे यांचा ४२१ मतांनी विजयी झाला आहे. तर शिवसेनेचे राजीव साबळे यांना २२१ मतांनी पराभव झाला आहे. तटकरे यांचा २०० मतांनी विजयी झाला आहे.

  • विदर्भात भाजपचा दबदबा कायम

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडण्यात येणाऱ्या विधानपरिषदेच्या जागेवर भाजपच्या रामदास आंबटकर यांनी विजय मिळवला. रामदास आंबटकर यांना ५५० मते मिळाली. तर काँग्रेसच्या इंद्रकुमार सराफ हे ४६२ मतांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

१०० टक्के सोमय्यांविरोधात निवडणूक लढविणार, सुनील राऊत यांचे किरीट सोमय्यांना आव्हान

News Desk

अण्णांच्या गर्जनांचा पचपचीत गाजर हलवा झाला | उद्धव ठाकरे

News Desk

नको ती लफडी केली म्हणूनच ईडी अन् येडी त्यांच्या मागे !

News Desk