HW News Marathi
राजकारण

विनोद तावडेंनी मुख्यमंत्र्यांच्या कारस्थानाला बळी पडू नये | संदीप देशपांडे

विशाल पाटील । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप विरोधात सभांचा धडाका लावला आहे. या सभांमध्ये राज ठाकरे सरकारच्या अनेक योजनांबाबत पोलखोल करत आहेत. भाजप कडून माध्यमांशी संवाद करण्याची जबाबदारी शिक्षण मंत्री विनोद तावडेंवर सोपविण्यात आली आहे. विनोद तावडे यांनी राज ठाकरेंच्या सभांना टुरींग टॉकीज आणि स्टॅन्डअप काॅमेडी आहेत अशी टीका केली होती त्यांवर मनसे कडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

तावेड यांच्या टीकेला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी विनोद तावडेंना मित्रत्वाचा सल्ला दिला आहे. “विनोद तावडेंनी पंतप्रधान रोजगार हमी योजनेत काम करत असल्यासारखे रोज पत्रकारपरिषदा घेण्यासाठी त्यांना ठेवले की काय असा प्रश्न मला पडतोय. मुख्यमंत्र्यांच्या कारस्थानाला बळी पडून नये, मुख्यमंत्री पत्रकार परिषदेत घेऊन त्यांचा वापर करताय हे लक्षात घ्यावे. एक दिवस विनोद तावडेंचाही मुख्यमंत्री किरीट सोमैय्या करतील त्यामुळे भाजपत रोजगार हमी योजनेवर काम करणे सोडावे त्यांच्या सकाळ-संध्याकाळ होणाऱ्या पत्रकारपरिषदांना कोणीही गांभिर्याने घेत नाही, असा टोला ही संदीप देशपांडे यांनी विनोद तावडेंना लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

Aprna

जागतिक आरोग्य संघटनेच्या कारभाराविरुद्ध संजय राऊत बोलले तर वादळचं आलं

News Desk

INX Media Case : माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम सीबीआयच्या ताब्यात

News Desk