HW News Marathi
राजकारण

महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा DJ च्या तालावर ‘धांगडधिंगा’!; कोरोना नियमांना हरताळ

बीड | बीड जिल्ह्यात कमी झालेले कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने काही निर्बंध लादले आहेत. मात्र असे असताना निर्बंधांमध्येही बीडमधील महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी चक्क डीजेच्या तालावर ठेका धरला. यावेळी बेभान होऊन कोरोनाचे नियम पायदळी तुडवले गेले. मात्र, यापैकी कोणीही मास्क लावले नव्हते. त्याचसोबत, इथे सोशल डिस्टनसिंगचाही अक्षरशः फज्जा उडालेला पाहायला मिळाला.

बीडच्या कपिलधार परिसरात ट्रेकिंगच्या नावाखाली अधिकाऱ्यांकडून हुल्लडबाजी करत भर रस्त्यात डीजेच्या तालावर धांगडधिंगा करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. त्यामुळे, या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नियम नाहीत का? नियम फक्त सर्वसामान्यांना आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आता जिल्हाधिकारी व महावितरणचे वरिष्ठ अधिकारी या प्रकरणी कारवाई करणार का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महात्मा ज्योतिबा फुले यांचे ‘शेतकऱ्यांचे आसूड’ हे पुस्तक नक्कीच प्रेरणादायी ठरेल! – उद्धव ठाकरे

Manasi Devkar

कर्नाटकातील मंत्रिमंडळाचा विस्तार, १७ मंत्र्यांनी घेतली शपथ

News Desk

शिवस्मारक हे पहिल्या दिवसापासून वादाच्या भोवऱ्यात !

News Desk