HW News Marathi
राजकारण

काँग्रेसला आज नवा अध्यक्ष मिळणार; मतमोजणीला सुरुवात

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस अध्यक्ष (Congress President) पदाच्या निवडणुकीची धुमधाम सुरू होती. या निवडणुकीत काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) विरुद्ध काँग्रेसचे लोकसभेचे खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांच्यात थेट सामना रंगला होता.  या काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक सोमवारी (17 ऑक्टोबर) मतदान पार पडली. या निवडणुकीचा आज (१९ ऑक्टोबर) निकाल येणार आहे. काँग्रेस अध्यक्ष पदाच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. तब्बल दोन दशकानंतर पहिल्यांदाच काँग्रेसला गांधी कुटुंबाबाहेरील अध्यक्ष मिळणार आहे.

या निवडणुकीत 96 टक्के मतदान झाले असून काँग्रेस समित्यांच्या 9 हजार 900 प्रतिनिधीपैकी 9 हजार 500 प्रतिनिधींनी मतदान केले आहे. देशातील छोट्या राज्यात 100 टक्के तर मोठ्या राज्यात 90 टक्के मतदान झाले आहे.  यात काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, महासचिव प्रियंका गांधी आणि काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी मतदान केले. तसेच काँग्रेस खासदार राहुल गांधी हे सध्या भारत जोडो यात्रे आहेत. राहुल गांधी बेल्लारीच्या कँपमधून मतदानाचा हक्क बजावला. राहुल गांधी यांच्यासोबत इतर 50 मतदारांनी या कँपमधून आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

काँग्रेस अध्यक्ष पदाच्या शर्यतीत या नेत्यांचे नाव चर्चेत

काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, मध्य प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह, राज्यसभेचे खासदार मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेचे खासदार शशी थरूर  यांची नावे सुरुवातीपासून चर्चे राहिली होती. परंतु, गेहलोत यांनी राजस्थानची राजकीय परिस्थितीमुळे काँग्रेस अध्यक्ष पदाच्या शिर्यतीतून बाहेर पडले. तर दिग्विजय सिंह यांनी खरगे निवडणुकीच्या शर्यती असल्यामुळे काँग्रेस पदाच्या अध्यक्ष पदाची निवडणुकीतून माघार घेतली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भाजपची बैठक सुरू

Gauri Tilekar

ठाकरे कुटुंबियांविरोधातील बेहिशेबी संपत्तीची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

Aprna

लोकसभेच्या निकालानंतर प्रथमच राज ठाकरेंनी घेतली पवारांची भेट

News Desk