श्रीनगर| जम्मू-काश्मीरमध्ये मोठी राजकीय घडामोड झाली आहे. भाजपाने जम्मू-काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती यांच्या पीडीपी सरकारचा पाठिंबा काढून घेतला असल्याने पीडीपी सरकार कोसळले असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. सध्याच्या जम्मू-काश्मीरच्या एकूण राजकीय परिस्थितीवर शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये भाजप आणि पीडीपी यांच्यातील युती तुटल्याचा आम्हाला आनंद आहे. भाजप आणि पीडीपी यांच्यातील युती देशद्रोही युती होती, अशी प्रतिक्रिया ही राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
Even if Governor rule is imposed in the Jammu & Kashmir, our efforts to fight terrorism will continue: Ram Madhav, BJP pic.twitter.com/IjODRTj2gN
— ANI (@ANI) June 19, 2018
जम्मू-काश्मीरमधील शस्त्रसंधी केंद्र सरकारने उठवल्यानंतर भाजप आणि पीडीपीमध्ये तणाव निर्माण झाल्या असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय सीमेवरील तणाव, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जवानांवर होणारी दगडफेक, कठुआ गँगरेप याबाबतच्या मुद्द्यावरुन भाजप आणि पीडीपीमध्ये मतभेद निर्माण झाले होते, त्याचा मंगळवारी युती तुटल्यानंतर शेवट झाला असेच म्हणावे लागेल. युती तुटल्यानंर भाजपाने जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करावी अशी मागणीही यावेळी भाजपने केली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.