मुंबई | “आगामी विधानसभेत भाजप-शिवसेना युतीला २८८ पैकी २४० जागा मिळतील. त्यामुळे आम्ही आमच्यासाठी १० जागांची मागणी केली आहे”, असे वक्तव्य रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले आहे. आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपलेल्या असताना सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. दरम्यान, भाजप-शिवसेना युतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. युतीच्या जागावाटपाचा निर्णय आता अंतिम टप्प्यात असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली होती.
Ramdas Athawale, Republican Party of India (RPI) on seat-sharing for Maharashtra Assembly elections: We have demanded 10 seats, RPI will stay with BJP and Shiv Sena and secure at least 240 seats together. pic.twitter.com/mu6WosXr5I
— ANI (@ANI) September 15, 2019
“आम्ही आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप-, शिवसेना युतीसोबत आहोत. विधानसभेत युतीला २८८ पैकी २४० जागा मिळतील. म्हणूनच आम्हाला १० जागा हव्या आहेत. तशी मागणी देखील आम्ही केली आहे”, असे रामदास आठवले एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले आहे. दुसरीकडे, रामदास आठवले यांनी कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढविण्यास देखील नकार दिला आहे. मित्रपक्षांनी कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढावी, अशी भाजपची इच्छा होती. मात्र, “आम्ही भाजपच्या चिन्हावर निडवणूक लढवली तर आमच्या पक्षाचे स्वतंत्र अस्तित्त्व राहणार नाही”, असे म्हणत आठवले यांनी त्यास नकार दिला.
गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्रीपद आणि जागावाटप या दोन मुद्द्यांवरून शिवसेना-भाजपमध्ये धुसफूस सुरु असल्याचे चित्र आहे. “आमचं सर्वकाही आलबेल सुरु आहे”, असा दावा जरी वारंवार शिवसेना-भाजपकडून करण्यात येत असला तरीही कार्यकर्ते आणि नेतेमंडळींमध्ये या मुद्द्यांवरून अनेक मतभेद आणि नाराजी असल्याचे स्पष्ट दिसून आले आहे. त्यामुळे, दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रम आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.