HW Marathi
राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

विधानसभेला आम्ही मनसेसोबत जाणार नाही !

मुंबई | “आम्ही मनसेशी युती करणार नाही. ईव्हीएमला विरोध या एका मुद्द्यावर जरी आमचे एकमत असले तरीही आमच्याच्या पक्षांच्या भूमिकेत, विचारसरणीत मोठा फरक आहे. त्यामुळे आम्ही मनसेसोबत जाणार नाही. मनसेची मराठी माणसासंदर्भातील भूमिक देश तोडण्याची भूमिका आहे”, असे स्पष्ट विधान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. गुरुवारी (१९ सप्टेंबर) मुंबईत झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर बोलत होते. यावेळी विधानसभेकरिता मनसेसोबत जाणार का ? या प्रश्नाला उत्तर देताना प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट नकार दिला आहे.

मनसेची मराठी माणसाची भूमिका देश तोडण्याची भूमिका !

मुंबई ही केवळ मराठी माणसांची आहे इतरांसाठी-बाहेरच्यांसाठी नाही, ही मनसेची भूमिका आम्हाला पटत नाही. मनसेची ही भूमिका देश तोडण्याची भूमिका आहे. आज इंदौर हे शहर पूर्णपणे मराठी माणसाचे आहे, मध्य प्रदेश अर्धे मराठी माणसाचे आहे, आग्र्यात मराठी माणूस आहे, हरियाणा सारख्या राज्यातही १८ लाख लोकांचे मूळ गाव महाराष्ट्रात आहे. आणि ही सगळी लोकं तिथे सुखा-समाधानाने नांदत आहेत. आम्ही मनसेसोबत गेलो तर त्यांची मराठी माणसाची भूमिका आमच्या अडचणीत वाढ ठरू शकते.

ईव्हीएमवरून थेट भाजपला आव्हान

“आम्ही मनसेसोबत जाऊन आमच्या अडचणी वाढवू इच्छित नाही. त्यामुळे हा निर्णय आम्ही घेऊ इच्छित नाही. त्याचप्रमाणे ईव्हीएमला विरोध या एका मुद्द्यावर जरी आमचे एकमत असले तरीही आमच्या पक्षाच्या विचारसरणीत मोठा फरक आहे. त्यामुळे आम्ही मनसेशी युती करणार नाही”, असेही प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले. त्याचप्रमाणे ईव्हीएमवरून त्यांनी आज भाजपला देखील थेट आव्हान दिले आहे. “तुम्ही सिद्ध करा कि ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही आणि आम्ही सिद्ध करतो कि ईव्हीएम हॅक करता येऊ शकते”, असे स्पष्ट विधान प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

Related posts

#Results2018 : भाजपने जनतेचा राग समजून आत्मपरिक्षण करावे !

News Desk

Rupali Chakankar NCP | असंही ‘त्यांचा’ कार्यकाळ संपणारच होता !

Pooja Jaiswar

संघ सोडल्यानंतर ख्रिश्चनांबाबत सुभाष वेलिंगकरांची मवाळ भूमिका

News Desk