नवी दिल्ली | पश्चिम बंगालमधील बालुरघाटमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ एका रॅलीला संबोधित करणार होते. मात्र पश्चिम बंगाल सरकारने योगी आदित्यनाथ यांच्या रॅलीला परवानगी नाकारली आहे. दरम्यान, पश्चिम बंगाल सरकारने कोणतीही नोटीस न पाठवता या रॅलीला परवानगी नाकारल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
Uttar Pradesh Chief Minister Office: The permission for the CM Yogi Adityanath's rally in West Bengal today has been declined by the West Bengal government without any prior notice. (File pic) pic.twitter.com/FQmTbsG1fV
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) February 3, 2019
कोलकाता सरकारने योगी आदित्यनाथ यांच्या हेलिकॉप्टर लँडिंगसह त्यांच्या रॅलीला परवानगी नकारली आहे. त्यामुळे सध्या स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी असून त्यांनी याला विरोध दर्शवायला सुरुवात केली आहे. यापूर्वी देखील भाजप अध्यक्ष अमित शहांच्या पश्चिम बंगालमधील रथयात्रेला कोलकाता उच्च न्यायालयाने दिलेली परवानगी मुख्य न्यायाधिशांच्या खंडपीठाने रद्द केली होती
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.