नवी दिल्ली | “भगवद गीतेत काय म्हटले आहे हे सर्वांनाच माहीत असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिंदू असले तरी त्यांना हिंदुत्वाबद्दल काहीही माहीत नाही. ते नेमके कोणत्या प्रकारचे हिंदू आहेत ?”, असा प्रश्न काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. उदयपूर येथील एका कार्यक्रमात राहुल गांधी बोलत होते.
R Gandhi in Rajasthan: What is the essence of Hinduism? What does the Gita say? That knowledge is with everybody, knowledge is all around you. Every living being has knowledge. Our PM says he is a Hindu but he doesn't understand foundation of Hinduism. What kind of a Hindu is he? pic.twitter.com/5F0WclZvdW
— ANI (@ANI) December 1, 2018
यावेळी राहुल गांधी यांनी सर्जिकल स्ट्राइक आणि नोटबंदीच्या निर्णयावरून पंतप्रधान मोदींवर टीका केली. “पंतप्रधान मोदी यांनी नोटाबंदीच्या निर्णयापूर्वी मंत्रिमंडळाला एका खोलीत बंद करून त्यानंतर त्यांनी हा नोटबंदीचा निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेचे नुकसान झाले असून या निर्णयामुळे दोन लाख लोक उद्ध्वस्त झाले”, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
“सर्जिकल स्ट्राइकचा निर्णय हा सैन्याचा निर्णय होता. मात्र, पंतप्रधान मोदींनी याचे श्रेय स्वतः घेऊन राजकीय फायदा करून घेण्याचा प्रयत्न केला”, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. “मनमोहन सिंग सरकारच्या काळात जेव्हा सर्जिकल स्ट्राइक झाले होते तेव्हा मनमोहन सिंग यांना सैन्याच्या अधिकाऱ्यांनी सर्जिकल स्ट्राइकबाबत गोपनीयता बाळगण्याची विनंती केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मात्र थेट सैन्याच्या डोमेनमध्येच प्रवेश केला”, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.