June 26, 2019
HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

आम्ही जसे ब्रिटिशांविरुद्ध लढलो, जिंकलो त्याचीच पुनरावृत्ती आताही करू !

नवी दिल्ली | “देशात ब्रिटिशांची सत्ता असताना स्वातंत्र्यलढा लढणाऱ्या काँग्रेसला एकाही घटनात्मक संस्थेने मदत केली नाही. तशीच परिस्थिती आताही निर्माण झाली आहे”, असे विधान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे. त्याचप्रमाणे,”आम्ही जसे ब्रिटिशांविरुद्ध लढलो आणि जिंकलो त्याची पुनरावृत्ती आम्ही आताही करू”, असे विश्वास देखील राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे. राहुल गांधी हे संसदीय पक्षाच्या बैठकीला संबोधित करत होते. लोकसभा निवडणुकांच्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

“देशात जेव्हा ब्रिटिशांचे राज्य होते तेव्हा स्वातंत्र्यलढा लढणाऱ्या काँग्रेसला एकाही घटनात्मक संस्थेने मदत केली नाही. तशीच परिस्थिती आताही निर्माण झाली आहे. सध्या देशातील एकही घटनात्मक संस्था काँग्रेसला साथ देणार नाही. परंतु, आम्ही जसे ब्रिटिशांविरुद्ध लढलो आणि जिंकलो त्याचीच पुनरावृत्ती आताही करू”, असा निर्धार राहुल गांधी व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकांच्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनाम्याचा प्रस्ताव काँग्रेस कार्यकारिणी समितीपुढे मांडला होता. मात्र, काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या सर्व सदस्यांनी एकमताने राहुल यांचा राजीनाम्याचा प्रस्ताव फेटाळून लावला होता.

“आम्ही संविधानासाठी तसेच वर्ण, धर्म, राज्य आणि धारणेला महत्त्व न देता प्रत्येक भारतीयासाठी लढत आहोत. आमची लढाई द्वेष, क्रोध आणि भ्याडपणाशी आहे याची जाणीव सर्व सदस्यांनी ठेवावी”, असेही राहुल गांधी म्हणाले. “काँग्रेसचा प्रतिकार नसला तर आपल्याला कोणीही अडवू शकणार नाही हे भाजपला माहित आहे. म्हणूनच त्यांना काँग्रेसमुक्त भारत हवा आहे”, असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले.

Related posts

राष्ट्रवादीचे सरकारविरोधात २ ऑक्टोबरला राज्यभर मौनव्रत धारण करत आंदोलन…

News Desk

फक्त राज्यमंत्री पद देऊन तोंडाला पाने पुसण्यात आली !

News Desk

शिवसेना-भाजपची युती तुटणार ?

News Desk