नवी दिल्ली | जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी या दोघांमधील जम्मू-काश्मीरवरून सध्या ट्वीटर वॉर पाहायला मिळत आहे. या दोघाच्या ट्वीटर वॉरमुळे राजकीय वर्तुळाचा चर्चेला विषय बनला आहे. राहुल गांधी यांनी आज (१४ ऑगस्ट) ट्विट करत काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी दिलेले निमंत्रणाचा स्वीकार करत काश्मीरमध्ये कधी येऊ हे सांगा, असा सवाल विचारला आहे.
Dear Maalik ji,
I saw your feeble reply to my tweet.
I accept your invitation to visit Jammu & Kashmir and meet the people, with no conditions attached.
When can I come?
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 14, 2019
राहुल गांधी यांनी मंगळवारी (१३ ऑगस्ट) ही मलिक यांना विरोधी पक्षाचे नेते आणि मी जम्मू काश्मीर आणि लडाखला भेट देतो. तुमच्या निमंत्रणासाठी मी कृतज्ञ आहे, असे त्यांनी म्हटले. तसेच आम्हाला विमानाची गरज भासणार नाही. परंतु कृपया आम्हाला प्रवास करण्याचे आणि तेथील लोक, मुख्य प्रवाहातील नेते आणि आमच्या सैनिकांना भेटण्याचे स्वातंत्र्य मिळेल याची खात्री करा,” असे ट्वीट राहुल यांनी मलिक यांना केले होते.
जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर येथे हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. परंतु प्रत्यक्षात जम्मू-काश्मीरमध्ये काय चालले आहे, याची माहिती पंतप्रधान मोदींनी देशाला द्यावी, असे आव्हान राहुल यांनी केले होते. त्याला मलिक यांनी प्रत्युतर दिले होते. त्यामुळे मी राहुल गांधींना काश्मीरमध्ये येण्याचे निमंत्रण देतो. त्यासाठी मी विमानदेखील पाठवेन. तुम्ही स्वत: परिस्थितीचा आढावा घ्यावा आणि मगच बोला. तुम्ही एक जबाबदार व्यक्ती आहात. त्यामुळे अशा प्रकारची बेजबाबदार विधाने तुम्हाला शोभत नाहीत, असे मलिक म्हणाले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.