नवी दिल्ली | “मी नुसते राजीव गांधींचे नाव घेतले तर त्यांच्या पोटात जोरदार दुखू लागले. त्यांनी नुसते रडणेच बाकी ठेवले आहे. मात्र, ते यावरून जेवढे रडतील तेवढेच जास्त जुने सत्य आजच्या पिढीसमोर येईल. जर राहुल गांधींमध्ये आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये हिंमत असेल तर निवडणुकीतील उर्वरित पुढचे दोन्ही टप्पे राजीव गांधी यांच्या मान-सन्मानाच्या मुद्द्यावर लढवून दाखवावेत”, असे खुले आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला दिले आहे. मोदी हे झारखंड येथील प्रचारसभेत बोलत होते.
My open challenge to Congress.
Fight elections in the name of the former PM associated with Bofors in:
Delhi and Punjab, where innocent Sikhs were butchered in his reign.
Bhopal, where he helped Warren Anderson flee after the infamous Gas Tragedy.
Challenge accepted? pic.twitter.com/CstT0VyITd
— Narendra Modi (@narendramodi) May 6, 2019
“मी नुसता बोफोर्स घोटाळ्याचा उल्लेख केला तर काँग्रेसमध्ये वादळ आले. मी नुसते राजीव गांधींचे नाव घेतले आणि त्यांच्या जोरदार पोटात दुखू लागले. त्यांनी नुसते रडणेच बाकी ठेवले आहे. मात्र, ते यावरून जेवढे रडतील तेवढेच याबाबतचे सत्य आजच्या पिढीला समजेल”, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. मी राहुल गांधींना आणि काँग्रेसच्या अन्य नेत्यांना खुले आव्हान देतो कि जर त्यांच्यात ताकद असेल तर देशातील लोकसभेचे उर्वरित पुढचे दोन्ही टप्पे त्यांनी राजीव गांधी यांच्या मान-सन्मानाच्या मुद्दा घेऊन लढवावेत, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.