HW News Marathi
राजकारण

सरकार ‘ऐतिहासिक’ शब्द वापरते तेव्हा हमखास फसवणूक होते !

मुंबई | राज्यातील एस.टी. कर्मचार्‍यांना ४८४९ कोटी रूपयांची ऐतिहासिक पगारवाढ दिल्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा खोटी असून कर्मचार्‍यांना अजूनही ही वेतनवाढ मिळालेली नाही. सरकार जेव्हा ‘ऐतिहासिक’ हा शब्द वापरते तेव्हा हमखास फसवणूक होते, असा टोलाही यावेळी धनंजय मुंडे यांनी लगावला आहे. त्याचप्रमाणे ‘दिवाळीपूर्वी ही वेतनवाढ न मिळाल्यास सरकारला आणि परिवहन मंत्र्यांना राज्यातील एस.टी. कर्मचारी दिवाळी साजरी करू देणार नाहीत,’ असा इशारा धनंजय मुंडे यांनी दिला आहे.

मुंबई येथील आझाद मैदानावर महाराष्ट्र एस.टी कामगार संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी उपोषण केले आहे. धनंजय मुंडे यांनी आंदोलनकर्त्या एस .टी कर्मचाऱ्यांची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी धनंजय मुंडे म्हणाले की, दिवाकर रावते यांच्या ४८४९ कोटी रुपयांच्या ऐतिहासिक घोषणेनंतर मला वाटले की आता एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटले. पण तरी शंका वाटलीच होती. कारण जेव्हा सरकार ‘ऐतिहासिक’ हा शब्द वापरते तेव्हा हमखास फसवणूक होते हे जगजाहीर आहे. त्याचप्रमाणे ही ऐतिहासिक घोषणा देखील फसवी निघाली, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आपच्या अतिशी यांचा गौतमवर ‘गंभीर’ आरोप

News Desk

…परंतु या मोदींमध्ये फरक आहे !

Gauri Tilekar

शिवसेनेकडून वनगांना लोकसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर

swarit