HW News Marathi
राजकारण

“जेव्हा आपण सत्तेत होतात…” केसरकरांचा उद्धव ठाकरेंच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाहाणीवर टोला

मुंबई | “जेव्हा आपण सत्तेत होतात, तेव्हा तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर गेले की नाही याची आठवण ठेवावी लागते. सत्तेत असताना कुठलेच निर्णय घेतले नाहीत”, असा टोला शिक्षण मंत्री दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या औरंगाबाद दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहाणी केली.

 

दिपक केसरकर म्हणाले, “बांधावर गेल्यानंतर आपण जेव्हा सत्तेत होतो. तेव्हा आपण कधी तरी बांधावर गेलात की नाही?, यांची आठवण ठेवावी लागते. उद्धवसाहेब हे जेष्ठ नेते आहेत. मी त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही आणि काही सेटमेंटही करणार नाही, असे याआधीही सांगितले आहे. परंतु, कोणतेच निर्णय होऊ शकले नाही, ही सुद्धा वस्थू स्थिती आहे. ज्या शेतकऱ्यांनी वेळेवर भरणार केला होता. यापूर्वी सुद्धा असे होऊ शकले असते. आता जवळजवळ दुप्पट नुकसान भरपाई आपल्याला मिळते. पंचनामे वेळेवर होत आहेत. हे पंचनामे पूर्वी का घडले नाही हा प्रश्न आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सहभाग घेत आहे. यामुळे पटापट निर्णय होत आहेत.”

उद्धव ठाकरे नेमके काय म्हणाले

औरंगाबादेतील दहेगावातील जाऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसाणीची पाहाणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेतून राज्याचेय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले, “हे सरकार स्पष्टपणे सांगते की, ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी परिस्थिती नाही. म्हणून मी मुद्दाम पाहाणी करायला आलोय. आणि ही माझी प्रतिकात्मक भेट आहे. खर काय खोटे काय हे आपल्या माध्यमातून केवळ सरकारलाच नव्हे. महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेला कळू देत. हे शेतकरी संकटनात असताना, काही काही जणांनी मला आता सांगितले की, त्यांना रेशन घेण्यासाठी देखील त्यांच्याकडे पैसे नाही. सरकार जो शिधा वाटप करते, तो शिधा येतोय कुठून शेतकऱ्यांकडूनच ना?, शिधा वाटप ते ही होत नाहीये?, असे सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केले आहे. या मुद्द्यावर उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले, “शिधा वाटपात घोटाळा झाला की नाही हा नंतर संशोधनाचे काम होऊ शकेल.”

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…तर राज्यात नवी समीकरणे निर्माण होऊ शकतात !

News Desk

उद्धव ठाकरेंचे आजच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

News Desk

शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल

News Desk