June 26, 2019
HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

जिथे सत्ता तिथे राधाकृष्ण विखे पाटील !

मुंबई | “जिथे सत्ता तिथे राधाकृष्ण विखे पाटील यांचे कुटुंब ! त्यामुळे ते सत्तेशिवाय राहू शकत नाही”, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आमदारकीच्या राजीनाम्याबाबत माध्यमांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नवाब मलिक यांनी हा आरोप केला आहे.

“राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा ज्यावेळी भाजपमध्ये गेला त्याचवेळी राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपमध्ये गेल्यासारखे होते. राधाकृष्ण विखे पाटील हे केवळ प्रसिद्धीसाठी टप्प्याटप्प्याने निर्णय जाहीर करत आहेत. विरोधी पक्षनेता गेला हे सांगण्यासाठी आज त्यांनी राजीनामा दिला आहे”, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी (४ मे) आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुंबईतील निवासस्थानी पार पडलेल्या काँग्रेसच्या नाराज आमदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून आता लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

Related posts

राहुल गांधी केरळच्या वायनाडमधून आज उमेदवारी अर्ज भरणार

News Desk

राहुल गांधी यांची आज मुंबईत जाहीर सभा

News Desk

पंतप्रधानांकडे आता प्रचारासाठी कोणतेही विकासाचे मुद्दे नाहीत !

News Desk