HW News Marathi
राजकारण

राज ठाकरेंच्या जाहीर सभांचा खर्च कुठल्या पक्षाच्या खात्यात दाखविणार ?

मुंबई | “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे स्टॅंड अप कॉमेडीचे शो सध्या सुरु आहेत. काल नांदेडला शो झाला. आता लवकरच महाराष्ट्रात अजूनही काही ठिकाणी त्यांचे स्टॅंड अप कॉमेडीचे शो होणार आहेत” अशी टिका आज (१३ एप्रिल) शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली आहे. “राज ठाकरे यांच्या जाहीर सभांचा खर्च नेमका कुठल्या पक्षाच्या खात्यात दाखविला गेला पाहिजे याची माहिती निवडणुक आयोगाने जनतेला द्यावी”, अशी मागणी आम्ही करणार असल्याचेही विनोद तावडे यांनी यावेळी सांगितले आहे.

“राज ठाकरे हे लोकसभा निवडणुकीत स्वतः कुठल्याही उमेदवाराचा प्रचार करीत नाहीत. पण आपल्या जाहिर सभांमध्ये कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला निवडून देण्याचे आग्रहाने आवाहन करीत आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या जाहीर सभांचा खर्च हा त्या सभेच्या ठिकाणच्या कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराच्या खात्यात करण्यात यावा, अशी मागणी आम्ही लवकरच निवडणूक आयोगाकडे करणार आहोत”, असेही विनोद तावडे यांनी स्पष्ट केले आहे.

“राज ठाकरे सध्या मोदी व अमित शहा यांना संपविण्याची भाषा करित असल्याबददल त्यांच्यावर टीका करताना श्री. तावडे उपरोधिकपणे म्हणाले की, राज ठाकरे यांच्या पक्षाचा एक खासदार नाही, एक आमदार पण नाही, उरले सुरलेले नगरेसवक सुध्दा पक्ष सोडून गेले. त्यामुळे स्वतचा पक्ष संपला असताना दुस-याला संपविण्याची भाषा हे कशी काय करतात ?”, असा सवालही यावेळी विनोद तावडे यांनी केला आहे.

“एका बाजूला नरेंद्र मोदी यांना जगातील विविध देशांमधून पुरस्कार मिळत आहे. मोदी यांना नुकतेच संयुक्त अरब अमिरातीचा सर्वोच्च ‘झायेद मेडल’ हा नागरी पुरस्कार, दक्षिण कोरियाचा शांतता पुरस्कार, पॅलेस्टाईनचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, संयुक्त राष्ट्र संघाचा पर्यावरण पुरस्कार, अफगाणिस्तानचा आमिर अमानुल्लाह खान पुरस्कार, सौदी अरेबियाचा पुरस्कार, रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाले आहेत. विविध देशांमध्ये मोदी यांना पुरस्कार देण्याची स्पर्धा सुरु आहेत. दुसरीकडे राज ठाकरे यांना मोदी हिटलर वाटत आहेत. मोदी यांच्या संदर्भात जे वास्तव जगाला कळाले ते राज ठाकरे यांनाही कळू शकेल”, असा टोलाही विनोद तावडे यांनी विचारला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवेंद्रसिंहराजेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजकीय चर्चांना उधाण

News Desk

मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी डी. के. शिवकुमार यांनी ईडीकडून अटक

News Desk

पोलादपूर बस दुर्घटनेवरुन भाजप सरकारवर उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र

News Desk