HW Marathi
राजकारण

संकटमोचक गिरीश महाजन !

आरती मोरे | आपण यांना पाहिलंत का ? नक्कीच पाहिलं असेल. कधी अण्णांचे उपोषण सोडवताना, लाल वादळ शमवताना, सुजय विखेंना भाजपमध्ये आणताना, रणजितसिंह मोहितेंना भाजपमध्ये आणताना. यांना मुलं पळविणाऱ्या टोळीचा म्होरक्या सुद्धा म्हटलं गेलंय…

काही नेते विशेष गोष्टींसाठी प्रसिद्ध असतात. काही नेते खूप सामर्थ्यवान म्हणून, काही मिश्किल स्वभावामुळे, काही भाषणांमुळे, काही आपल्या वेगळ्या शैलीमुळे तर काही आपल्या अनोख्या कामामुळे. जेव्हा जेव्हा सरकार संकटात सापडलं तेव्हा तेव्हा सरकारला या संकटातून तारून नेण्याचं काम त्यांनी केलंय, सरकारला अडीअडचणीच्या काळात त्यांचंच नाव आठवतं. सरकारला या परिस्थितीतून योग्यरित्या बाहेर काढण्यासाठी संकटमोचक म्हणून त्यांची ख्याती आहे. कोणी त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणसवीस यांचा राईट हॅन्ड म्हणतो तर कोणी त्यांना प्रमोद महाजनांची सावली म्हणतो.

तुमच्या लक्षात आलंच असेल कि मी कोणाबद्दल बोलतेय. महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन.. या नावाची ओळख करून द्यायची गरज आहे, असे मला वाटत नाही. कारण गेल्या काही वर्षांमध्ये विशेषतः गेल्या काही दिवसांमध्ये आपण याना पाहिलंच असेल. राज्याचे जलसंपदा मंत्री असले तरी राज्यासाठी क्रायसिस मिनिस्टर किंवा संकटमोचक मंत्री म्हणून त्यांनी काम बजावलंय. राजकारणात जितकं मुत्सद्दी असं गरजेचं आहे तितकंच एखाद्या पक्षात असा माणूस असणं सुद्धा गरजेचं आहे.

पण गिरीश महाजनांनी नेमकं काय केलंय ?

जेव्हा मुंबईच्या दिशेने लाल वादळ कूच करत होतं, सरकारच्या अविश्वासू धोरणांना कंटाळून त्यांच्या विरोधात एवढं मोठा आंदोलन परत  माघारी कसं पाठवायचं हा प्रश्न नक्कीच सरकारपुढे होता, त्यावेळी मध्यस्थी म्हणून गिरीश महाजन यांना पाठवण्यात आलं. आणि त्यांनी ती जबाबदारी व्यवस्थित पार पडली. लाल वादळ फिरलं, सरकारवरच संकट टळलं

अण्णा हजारेंचं रामलीला मैदानावरच उपोषण असो अथवा राळेगणसिद्धीतलं उपोषण सगळ्यात पहिल्यांदा तिथे कोण पोहोचलं ? गिरीश महाजन .. अण्णांच्या मागण्या ऐकून घेऊन सरकारच्या वतीने आपली बाजू मांडली  आणि अण्णांचं उपोषण  थांबवण्यासाठी त्यांनी पराकोटीचे प्रयत्न केले. नंतर मुख्यमंत्री आले आणि त्यांनी उपोषण सोडवल त्यावेळीही गिरीश महाजन उपस्थितीत होते, केरळवर पुरासारखं एवढं मोठं संकट ओढवलं त्यावेळी सरकारच्यावतिने गिरीश महाजन यांनी शक्य तितकी मदत केली.

गेल्या १ महिन्यात अजून एका वेगळ्या कारणासाठी ते प्रसिद्धीत आले ते म्हणजे ? लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिकीट मिळण्या न मिळण्यावरून प्रत्येक पक्षात नाराजी नाट्य सुरु होत. राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे याना अहमदनगर इथून निवडणूक लढवायची होती मात्र हि जागा राष्ट्रवादीला सुटल्याने त्यांना उमेदवारी मिळन मुश्किल झालं, आणि मग सुजय विखे नाराज आहेत हे पाहून गिरीश महाजन यांनी त्यांच्याशी चर्चा सुरु केली, भेटीगाठी वाढल्या, पक्षप्रवेश करणार नाही असे सांगणारे सुजय विखे पाटील हसत हसत भाजपमध्ये गेले आणि त्यांना भाजपकडून अहमनगरची उमेदवारी मिळाली. अगदी सहजपणे गिरीश महाजन यांनी नेम लावला आणि तो लागलासुद्धा, मासा गळ्याला लागला.आघाडीला खिंडार पाडण्यात ते यशस्वी झाले, कदाचित मुख्यमंत्र्यांनीच त्यांना या मोहिमेवर पाठवलं असावं, महाजनांनी ऑपरेशन सुजय यशस्वी केलं.

मुले पळवणारी टोळी सक्रिय झालीये, नाराजांना भाजपचे दरवाजे उघडे आहेत अशा पद्दतीच्या चर्चांना  उधाण आलं.दुसरीकडे माढ्यामधील मोहिते-पाटील आणि पवार घराण्याचं वैर सगळ्या परिचित आहे. मग काय ऑपरेशन रणजितसिंह मोहिते सुरु झालं आणि गिरिश महाजनांनी ज्या दिवशी सुजय चा भाजप प्रवेश त्या दिवशीचं रणजितसिंह यांची सुद्धा भेट घेतली आणि पुढच्या काही दिवसात रणजितसिंह हे भाजप मध्ये दाखल झाले. टीकेची झोड उठली. आजच्या  युवकांमध्ये पक्षनिष्ठा  नाही, फक्त  उमेदवारीची लालसा आहे, हे असे लोक राजकारणात टिकणार नाहीत.

पण या सगळ्यात हिरो कोण झाला ? भाजप ? नाही. गिरीश महाजन !

सरकारच्या मदतीला धावून येण्याच्या गिरीश महाजनांच्या या वृत्तीची तुलना प्रमोद महाजन यांच्याशी केली जाऊ लागली आहे. ज्याप्रमाणे प्रमोद महाजन हे केंद्रात समेट घडवून आणण्यात आघाडीवर होते तसेच आता युतीमधल्या घटक पक्षांचा रुसवा लक्षात घेऊन  त्यांनासोबत आणण्यासाठी गिरीश महाजन यांनी केलेली कामगिरी भाजपसाठी खूप महत्वाची आहे. प्रमोद महाजन यांनी पहिल्यांदा गिरीश महाजन यांना विधानसभेसाठी पहिल्यांदा उभं केलं होतं. तेव्हापासून आजपर्यंत विधानसभेवर त्याची पकड आहे. आपल्या जामनेर मतदारसंघात त्यांचं मोठं काम आहे. गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्या तालमीत आणि आधीपासूनच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या चळवळीतून आलेले गिरिश महाजन हे आत्ताच्या काळात देवेंद्र फडणवीस यांचे सगळ्यात जवळचे  मानले जातात. त्यांच्या प्रत्येक कठीण प्रसंगी त्यांना गिरीश महाजनच आठवतात.

वाटाघाटी करण्यात एकदम तरबेज आणि पटाईत … भाजपने जरी मुलं  पळवली असली  तर मग कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांना का जाऊन दिलं. आपापल्या नेत्यांना सांभाळण्यात ते अयशस्वी  झालेत कि, गिरीश महाजन यांचं मन वळवण्याचा कसब काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जरा जास्तीच जड जातंय.. भाजपाच्या नेत्यांचा खरपूस समाचार घेणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीसुद्धा मागे एकदा माझ्या पक्षात गिरिश महाजन यांच्यासारखा संकटमोचक नेता असता तर मी बारामतीची जागा सुद्धा जिंकली असती अशा शब्दांत त्यांचं कौतुक केलंय. थोडक्यात काय सध्या भाजपमध्ये सध्या गिरीश महाजन यांच्या नावाला भरभक्कम वजन आलंय. त्यांना आता भाजपचे गेटवेच म्हणावं लागेल.

Related posts

ममता बॅनर्जी झाशीची राणी नाही तर पुतना मावशी !

News Desk

शत्रुघ्न सिन्हा आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार ?

News Desk

बेस्टच्या संपात आम्ही हस्तक्षेप करणार नाही !

News Desk