HW News Marathi
राजकारण

मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ की ज्योतिरादित्य नक्की कोण होणार मुख्यमंत्री

भोपाळ |मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. गेल्या १५ वर्षापासून मध्य प्रदेशमध्ये भाजपची सरकार होती. या काळात शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्री होते. काँग्रेसची सरकार स्थापन होणार हे जर निश्चित झाले असले तरी काँग्रेसने अद्याप मुख्यमंत्री पदाचे नाव जाहीर केले नाही. मध्य प्रदेशात ज्येष्ठ नेते कमलनाथ आणि युवा चेहरा असलेल्या ज्योतिरादित्य यांच्यामध्ये जोरदार चुरस आहे. मुख्यमंत्री पदाचे सर्व अधिकार काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना देण्यात आले आहेत.

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी लवकरच मध्य प्रदेशमध्ये पदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर करणार आहे. काँग्रेसने बैठक घेण्यात आली होती. ही बैठक संपली असून काही वेळाने सर्वांना कळेल की, मध्य प्रदेशाच मुख्यमंत्री कोण होणार यांची उसत्सुकता पाहयाला मिळात आहे.

मध्य प्रदेशमध्ये भाजपला १०९ जागा, काँग्रेसला ११४ जागांनी विजयी मिळाला आहे. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसची सरकार व्हावी म्हणून मायावतीने काँग्रेला पाठिंबा दिला आहे. मायावती पाठोपाठ आता सपाने देखील काँग्रेसला पाठिंबा दिल्याचे अखिलेश यादव यांनी त्यांच्या ट्विटरवरून सांगितले आहे. मायावतीला २ जागा आणि सपाने १ जागा मिळाल्या आहेत. या दोन्ही पक्षांनी काँग्रेसला पाठिंबा दिले आहे. यामुळे काँग्रेसला सत्ता स्थापन करण्यासाठी स्पष्ट बहुमत मिळाले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी नुसते राजीव गांधींचे नाव घेतले अन् त्यांच्या पोटात जोरदार दुखू लागले !

News Desk

“आमच्यात शिवसेनेचे ‘स्पिरीट’,” निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवल्यानंतर राऊतांची पहिली प्रतिक्रिया

Aprna

‘फक्कड’ मुलाखतींचा पायंडा पाडून मोदी यांनी नव्या पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली | ठाकरे

News Desk