राळेगणसिद्धी | ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आज (५ फेब्रुवारी) सातवा दिवस आहे. राज्य सरकारने अण्णांच्या उपोषणाची दखल घेतली असून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राळेगणसिद्धी येथे जाऊन अण्णा हजारेंची भेट घेतली आहे. दरम्यान, यामुळे आता अण्णा हजारे लवकरच उपोषण मागे घेणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र, अद्याप अशी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
Maharashtra CM Devendra Fadnavis, Union Agriculture Minister Radha Mohan Singh and MOS Defence Subhash Bhamre meet Anna Hazare at Ralegan Siddhi. Anna Hazare has been on an indefinite hunger strike from January 30. pic.twitter.com/t7WgFj0xcb
— ANI (@ANI) February 5, 2019
जलसंपदामंत्री गिरीश महाजन, केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री सुभाष भामरे यांनी अण्णा हजारे यांची भेट घेऊन उपोषण सोडण्याची विनंती केली होती. मात्र अण्णांनी आपण आपल्या मागण्यांवर ठाम असलयःचे स्पष्ट केले होते. अण्णांच्या उपोषणाचा सातवा दिवस असल्याने सरकारच्या निषेधार्थ राळेगणसिद्धीतील ग्रामस्थांनी चूल बंद ठेऊन एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. जनावरांनाही आंदोलनस्थळी आणून बांधण्यात आले आहे. शेतक-यांच्या प्रश्नांबाबत सरकारला जाग यावी, यासाठी जनावरांनाही आज आंदोलनस्थळी आणण्यात आले आहे. माजी सैनिकही आंदोलनात सहभागी झाले आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.