मुंबई – नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या (Nagpur Winter Session) पहिल्याच दिवशी सीमावादावरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपली आहे. फेक ट्विट्सवरून (Fake Tweets) राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. त्यातच आता जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सुद्धा ट्विट करत यात उडी घेतली आहे. “कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले ट्विट त्यांनी केलेले नाही, असे कर्नाटक व महाराष्ट्र (Karnataka-Maharashtra) दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री सांगतात.” असं म्हणत बसवराज बोम्मई यांच्या फेक ट्विटच्या वक्तव्यावर प्रश्न उपस्थित केला.
सीमावादावरून झालेल्या बैठकीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांचं ट्वीट फेक असल्याचं सांगितलं होतं. त्यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. बेळगावात लोकप्रतिनिधींना जाऊ दिलं जात नाहीय, तर तिथले मुख्यमंत्री उघड उघड महाराष्ट्राची बदनामी करणारी विधानं करत आहेत तरी सरकार काही बोलत नाही असा हल्लाबोल पवारांनी शिंदे सरकारवर केला. मात्र, आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुद्धा यात ट्विट करून सर्वांचे लक्ष वेधले आहे.
ट्विटरवर गेल्या काही दिवसांत धोरणात्मक बदल घडवून आणल्यानंतर, ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) एलोन मस्क (Elon Musk) यांनी मायक्रोब्लॉगिंग वेबसाइटवर पोल द्वारे लाखो वापरकर्त्यांना “मी ट्विटरच्या प्रमुखपदावरून पायउतार व्हावे का?”, असा प्रश्न विचारला ज्यावर अनेक युजर्सनी संमिश्र अश्या प्रतिक्रिया दिल्या. मात्र, जयंत पाटील यांनी थेट एलोन मस्क यांच्या या ट्विटचा आधार घेत सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. “@elonmusk, आपण ट्विटरच्या प्रमुख पदावरून वरून पायउतार होण्यापूर्वी काय तो नक्की निकाल द्या, हे ट्विट नक्की कोणी केले आहे”? असं म्हणत सीमावादावर खुलासा करण्यास सांगितलं आहे.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले ट्विट त्यांनी केलेले नाही, असे कर्नाटक व महाराष्ट्र दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री सांगतात. @elonmusk , आपण ट्विटरच्या प्रमुख पदावरून वरून पायउतार होण्यापूर्वी काय तो नक्की निकाल द्या, हे ट्विट नक्की कोणी केले आहे ? https://t.co/bmTMkjTOkv
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) December 19, 2022
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.