मुंबई | अभिनेता विवेक ओबेरॉय यांनी “हाहाहा..क्रियेटीव्ह ! नो पॉलिटिक्स हिअर…जस्ट लाईफ ” अशी कॅप्शन लिहित मीम्स ट्वीट केले आहे. या ट्विटची दाखल राज्य महिला आयोगाने घेत विवेकला नोटीस बजावली जाणार असल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सांगितले आहे. हे मीम्स रीट्वीट करत विवेकने महिलांचा अनादर केला असल्याचे रहाटकर यांनी म्हटले आहे.
अभिनेता विवेक ओबेरॉय यांनी केलेल्या ट्वीटची दखल राज्य महिला आयोगाने घेतली आहे. त्यांना नोटीस बजावली जाईल. त्यांचे ट्वीट महिलेचा अनादर करणारे आहे…
: विजया रहाटकर,
अध्यक्षा, राज्य महिला आयोग @CMOMaharashtra @MahaDGIPR @vivekoberoi pic.twitter.com/CP7Gee5i5X— Maharashtra State Commission for Women (@Maha_MahilaAyog) May 20, 2019
विवेकने एक्झिट पोलवरून मीन्स सोशल मीडियावर चांगलेच धुमाकूळ घालत आहेत. या ट्वीटद्वारे अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला निशाण्यावर साधला आहे. विवेकने एक्स-गर्लफ्रेंड ऐश्वर्याचे फोटो ट्विटरवरून पोस्ट केले आहेत. हे फोटो पाहून सोशल मीडिया युजर्स कॉमेंट्स देत आहेत.
https://twitter.com/vivekoberoi/status/1130380916142907392
लोकसभा निवडणुकीचे काल (१९ मे) मतदान पार पडल्यानंतर निकालांचे विविध एक्झिट पोल जाहीर झाले. या एक्झिट पोलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच सरकार सत्तेवर येईल, असा अंदाज एक्झिट पोलद्वारे व्यक्त केला जात आहे. यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला. विरोधकांची, एक्झिट पोलची खिल्ली उडवणारे अनेक मीम्स शेअर केले गेलेत. विवेकने हे मीन्स शेअर करत म्हटले की, “हाहाहा..क्रियेटीव्ह ! नो पॉलिटिक्स हिअर…जस्ट लाईफ ” अशी कॅप्शन दिली आहे. या मीम्समधील ओपिनियन पोलमध्ये ऐश्वर्यासोबत अभिनेता सलमान खान आहे. एक्झिट पोलमध्ये ऐश्वर्या विवेक ओबेरॉयसोबत तर रिझल्टमध्ये ऐश्वर्या अभिषेक बच्चनसोबत आहे.
भाजपला समर्थन करतांना पद्मश्रीने गौरवान्वीत ऐश्वर्या बच्चन यांचा एक्झिटl च्या नावाने अपमान केलेला आहे. महिलांबाबतच्या मर्यादेचे भानही उरलेले नाही. अशांना शिक्षा होणे गरजेचे तात्काळ गुन्हा नोंदवून अटक करा विवेकला महिला आयोग कारवाई झालीचे पाहिजे. असे ट्वीट राष्ट्रवादी महिला प्रदेध्यक्षा चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया राहटकर यांच्यावर टीका केली आहे.
.@BJP4India ला समर्थन करतांना पद्मश्री ने गौरवान्वीत ऐश्वर्या बच्चन यांचा exitpoll च्या नावाने अपमान केलेला आहे महिलांबाबतच्या मर्यादेचे भानही उरलेले नाही अशांना शिक्षा होणे गरजेचे तात्काळ गुन्हा नोंदवून अटक करा@vivekoberoi ला महिला आयोग कारवाई झालीचं पाहिजे @VijayaRahatkar
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) May 20, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.