HW News Marathi
राजकारण

तेजबहादूर यादव यांची वाराणसीची उमेदवारी रद्द केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव

नवी दिल्ली | वाराणसी लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात निवृत्त जवान तेजबहादूर यादव यांनी समाजवादी पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, तेजबहादूर यादव यांनी माहिती लपवल्याचा आक्षेप घेत निवडणूक आयोगाने त्यांची उमेदवारी रद्द केली. दरम्यान, या प्रकरणी आता तेजबहादूर यादव यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तेजबहादूर यादव यांनी जवानांना दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या दर्जाबद्दल शंका उपस्थित करणारा एक व्हिडीओ तयार केला होता. ज्यामुळे यादव यांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल होते.

प्रख्यात वकील प्रशांत भूषण हे तेजबहादूर यादव यांच्याबाजूने सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण लढतील. तेजबहादूर यादव यांचा जवानांना मिळणाऱ्या जेवणाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित करणारा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. सुरक्षा दलाकडून तेजबहादूर यांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल. दरम्यान, या निलंबनाच्या कारवाईबाबतची कागदपत्रे, माहिती न दिल्यानेच निवडणूक आयोगाकडून यादव यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे. मात्र, निवडणूक आयोगाचा हा निर्णय पक्षपाती असल्याचा आरोप यादव यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस; विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन

Aprna

फडणवीस पवारांची राजकीय जुगलबंदी

News Desk

राजकारण व्यासपीठ आणि छत्रपती

News Desk