बंगळुरू | कर्नाटकमध्ये नाट्यावर अखेर पडता पडला आहे. कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएसचे सरकार कोसळले आहे. कुमारस्वामी सरकारने विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडल्यानंतर ९९ आमदारांनी सरकारच्या बाजूने, तर १०५ आमदारांनी सरकारच्या विरोधात मतदान केले. यानंतर कर्नाटकात भाजपचे सरकार बनविण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष येडियुरप्पांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यानंतर आज (२४ जुलै) सकाळी ११ वाजता ही बैठक होणार आहे.
#UPDATE: Karnataka Bharatiya Janata Party (BJP) Legislature Party meeting concludes. Another meeting scheduled to be held tomorrow at party office in Bengaluru at 11 am. https://t.co/spZJgjkkw7
— ANI (@ANI) July 23, 2019
येडियुराप्पांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना पाठिंबा दिल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत. १४ महिन्यांच्या सरकारला २० आमदारांची बंडखोरी भोवली आणि कुमारस्वामी यांचे सरकार कोसळले. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना विश्वासदर्शक ठरावावेळी बहुमत सिध्द करता आले नाही. त्यामुळे त्यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल वजूभाई वाला यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सादर केला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.