अलिगड | “दोनपेक्षा अधिक मुलांना जन्म देणाऱ्यांचा मतदानाचा अधिकार काढून घ्या. शिवाय अशा लोकांना निवडणूक लढवण्याची परवानगी दिली जाऊ नये,” असा सल्ला योग गुरू बाबा रामदेव यांनी सरकारला दिला आहे. पुढे बाब रामदेव असे देखील म्हणाले की, सरकारी नोकरी व वैद्यकीय सुविधा काढून घेतल्या जावे. या सर्व गोष्टी रोखल्यानंतरच लोकसंख्येवर आपोआप नियंत्रण येईल.”
Yog Guru Ramdev: Those who have more than 2 children, their voting rights should be taken away & they shouldn't be allowed to contest elections. Don't let them use govt schools, hospitals, & don't give them govt jobs. Population will be controlled automatically. (23-1-19) pic.twitter.com/IQ0tYMbc1o
— ANI (@ANI) January 24, 2019
उत्तर प्रदेशातील अलिगढमध्ये बुधवारी (२३ जानेवारी) एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. लोकसंख्या नियंत्रणाबाबत रामदेव बाबा यांनी याआधीही अशा प्रकारची विधाने केले होते. यापूर्वीही योग गुरु बाबा रामदेव यांनी लोकसंख्या नियंत्रणावरुन अशाच पद्धतीचे वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, ज्यांचे दोनपेक्षा जास्त मुले आहेत त्यांना सरकारी शाळेत प्रवेश देण्यात येऊ नये तसेच सरकारी हॉस्पिटल व सरकारी नोकरीची सुविधा देण्यात येऊ नये.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.