HW News Marathi
अर्थसंकल्प

योगी सरकारचा ४ लाख ७० हजार ६८४ कोटींचा अर्थसंकल्प सादर

लखनऊ | उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारचा आज (७ फेब्रुवार) तिसरा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योगी सरकारसाठी यंदाचा अर्थसंकल्प महत्वाचा मानला जात आहे. उत्तर प्रदेशचे अर्थमंत्री राजेश अग्रवाल यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. योगी सरकारने यावेळी ४ लाख ७० हजार ६८४ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे.

या अर्थसंकल्पात सर्व वर्गाला खूश करण्याचा प्रयत्न योगी सरकारकडून करण्यात आला आहे. राज्यातील अयोध्येमधील प्रमुख पर्यटन स्थळांच्या एकीकृत विकासासाठी १०१ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. तसेच गोसंवर्धनावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. राज्यात गोशाळा व्यवस्थापनासाठी २४७ कोटी रुपयांची मंजुरी केले आहे. तर शहरी भागात कान्हा गोशाळा आणि आवारा पशू शेल्टर योजनेसाठी २०० कोटी रुपयांची मंजुरी केले आहेत.

अर्थसंकल्प सादर करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, ‘यंदाचा अर्थसंकल्प सर्वात मोठा आहे. गेल्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत ११.९८ टक्के जास्त आहे. गेल्या काही दशकांपूर्वी ज्या योजना पूर्ण करण्यात आल्या नाहीत. त्या योजना आमचे सरकार पूर्ण करणार आहे. याशिवाय, सध्या आमच्या सरकारवर कर्जमाफीचा दबाव नाही. त्यामुळे अधिक योजना लागू करण्यात येणार आहेत.’

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Budget2019 : यंदाच्या अर्थसंकल्पात नोकरदारांना मिळणार खुशखबर ?

News Desk

#Budget2019 : अन् भाजप खासदारांनी विचारले ‘हाऊ इज द जोश ?’

News Desk

#Budget 2019 : सरकारकडून असंघटित कामगारांना मिळणार पेन्शन

News Desk