नवी दिल्ली | “तुम्हाला माझ्याबद्दल, राजीव गांधींबद्दल बोलायचे आहे ? बिनधास्त बोला. मात्र, या राफेल प्रकरणात नेमके काय काय झाले ते जनतेला सांगा”, असे खुले आव्हान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान मोदी त्यांच्या प्रचारसभांमधून माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर टीका करत आहेत. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी बोलत होते. “तुम्ही तुमच्या श्रीमंत मित्रांना पैसे वाटा आणि मी देशातील गरिबांना वाटतो”, असा टोला देखील राहुल गांधी यांनी यावेळी लगावला.
#WATCH: Rahul Gandhi says in Haryana's Sirsa "Agar aapko Rajiv Gandhi ji aur meri baat karni hai aap zaroor kijiye, dil khol ke kijiye. Magar janta ko samjha dijiye ki aapne Rafale maamle mein kya kiya kya nahi kiy…jo vaada kiya tha 2 cr yuvaon ko rozgar ka wo poora nahi kiya" pic.twitter.com/Ui1dSrqvYs
— ANI (@ANI) May 9, 2019
“तुम्हाला माझ्याबद्दल किंवा राजीव गांधी यांच्याबाबत जे काही बोलायचे आहे ते बिनधास्त बोला. परंतु, राफेल प्रकरणात नेमके काय झाले ? त्यावरही बोला. तुम्ही देशातील युवकांना दिलेल्या २ कोटी रोजगारांच्या आश्वासनावर देखील बोला”, असा राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना लगावला आहे. “पंतप्रधान मोदी केवळ अनिल अंबानी, नीरव मोदी यांसारख्या उद्योगपतींसाठीच काम करतात. त्यांचेच कर्ज माफ करतात. त्यांना देशातील गरिब जनतेशी काहीही देणेघेणे नाही”, अशी टीका राहुल यांनी केली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.