HW News Marathi
राजकारण

तुम्ही स्वतःला ‘गांधी’ समजण्याची घोडचूक करूच नये !

मुंबई | काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी (१४ डिसेंबर) दिल्लीतील रामलीला मैदानावर झालेल्या काँग्रेसच्या ‘भारत बचाव रॅली’त वीर सावरकरांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे आता देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. राज्यात भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेकडून देखील राहुल गांधी यांच्या या विधानाचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आता भाजपचे नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला आहे. “काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे विधान अतिशय निंदनीय आहे. ते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नखाची सुद्धा बरोबरी करू शकत नाही आणि स्वतःला ‘गांधी’ समजण्याची घोडचूक तर त्यांनी अजिबात करू नये. केवळ आडनाव गांधी असल्याने कुणी ‘गांधी’ होत नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे”, असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

“स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपल्या जीवनाची आहुती मातृभूमीसाठी दिली. सर्वस्व अर्पण केले. त्यांच्याबद्दल अशी भाषा वापरणे, हा देशासाठी परमोच्च त्याग करणाऱ्या तमाम देशभक्तांचा अवमान आहे. त्यामुळे आता आणखी एका विधानासाठी राहुल गांधी यांनी संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे”, अशी मागणी देखील यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्याचप्रमाणे, उद्या (१६ डिसेंबर) होणाऱ्या राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या भाजपच्या पत्रकार परिषदेत देखील देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या वीर सावरकरांविषयीच्या वक्तव्यावर पुन्हा एकदा टीका करत शिवसेनेला देखील धारेवर धरले.

शिवसेनेने घेतलेली भूमिका सौदेबाजीची !

“राहुल गांधींच्या सावरकरांविषयीच्या वक्तव्यानंतर शिवसेनेने घेतलेली भूमिका अत्यंत मावळ आणि सौदेबाजीची होती. आम्ही नेहरू-गांधींचा आदर करतो म्हणून तुम्ही सावरकरांचा आदर करा, असे शिवसेनेने म्हणणेच चुकीचे आहे. तुम्ही सावरकरांचा आदर केलाच पाहिजे, असे शिवसेनेने काँग्रेसला सांगायला हवे होते. राहुल गांधी यांना सावरकरांच्या कार्याची माहिती नाही. शिवसेना सत्तेसाठी किती काळ लाचारी स्वीकारणार ? राहुल गांधींच्या या वक्तव्याचे पडसाद नक्की उमटणार”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्याचप्रमाणे, यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार देखील टाकला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बेस्टच्या संपावर उद्या उच्चस्तरीय समितीची बैठक

News Desk

भाजपच्या पराभवासाठी शरद पवार निवडणुकीच्या रिंगणात

News Desk

राष्ट्रपतींनी स्वीकारला एम.जे.अकबरांचा राजीनामा

News Desk