HW News Marathi
राजकारण

माझ्याकडून डॉक्टरांचा अपमान झाला नाही, माझी ती भावनाही नव्हती – संजय राऊत

मुंबई | शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी डॉक्टरांबद्दल अत्यंत अवमानजनक वक्तव्य केल्याबद्दल त्यांनी समस्त डॉक्टरवर्गाची माफी मागावी, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) महाराष्ट्र शाखेने केली आहे. आयएमए कार्यकारिणीच्या काल (१६ ऑगस्ट) झालेल्या बैठकीत राऊत यांच्या बाबतच्या मागणीचा तसेच राऊत यांच्या निषेधाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. त्यानंतर, खासदार संजय राऊत यांनी आपल्या वक्तव्यावरुन यु टर्न घेतल्याचं दिसून आले आहे.

जागतिक आरोग्य संघटना आता राजकीय संघटना झाली असल्याची टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसंच कंपाऊंडर काही टाकाऊ नसतात असं म्हणत संजय राऊत यांनी टीकाकारांना उत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी एबीपी माझावरील कार्यक्रमात बोलताना मी कधीही डॉक्टरकडून औषध घेत नाही कंपाऊंडरकडून घेतो, त्याला जास्त कळतं असं विधान केलं होतं. त्यानंतर त्यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे. संजय राऊत यांनी सामना कार्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी करोना काळात डॉक्टर देवदूतासारखं काम करत आहेत असं सांगताना माझ्याकडून डॉक्टरांचा अपमान झालेला नाही असे म्हटले आहे.

“कोरोनाच्या काळात शिवसेनेच्या अनेक लोकांनी डॉक्टरांविरोधात आंदोलन केले. तेव्हा त्यांची मी समजूत काढली. अनेकदा मी डॉक्टरांच्या बाजूने उभा राहिलो आहे. मार्डच्या अनेक संप आणि मागण्यांबाबत मी भक्कमपणे बाजू मांडली आहे. काही विशिष्ट पक्षांची लोक डॉक्टरांना हाती घेऊन मोहीम चालवत आहेत. माझ्याकडून डॉक्टरांचा अपमान झाला नाही. माझीही ती भावनाही नव्हती. अपमान आणि कोट्यांमधला फरक समजून घेतला पाहिजे,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

“कंपाऊंडर काही टाकाऊ नसतात. उलट माझे कौतुक केले पाहिजे. डॉक्टरांनी आपला कंपाऊंडरही ताकदीचा निर्माण केला आहे हे कौतुकास्पद आहे. हे जगात कुठे नाही तर भारतातच आहे. कंपाऊंडरचा सन्मान केला म्हणून इतकं टोकाची भूमिका घेण्याची गरज नाही,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.“जागतिक आरोग्य संघटना ही राजकीय संघटना झाली आहे. हे माझंच नाही तर अनेक देशांचं म्हणणं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीरपणे त्यांना फटाकलं आहे. संबंधही तोडले आहेत. कारण तिथे डॉक्टर कमी आणि राजकारणी जास्त झाले आहेत. करोनाचा फैलाव होण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना जबाबदार असल्याचं अनेक देशांनी म्हटलं आहे. येथील डॉक्टरांना ते विधान गांभीर्याचं घेण्याची गरज नाही,” असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

“मला कोणीतरी क्लिप पाठवली. नरेंद्र मोदींनी लंडनला जाऊन डॉक्टरांचा अपमान केला होता. आमच्याकडील डॉक्टर कसे व्यापारी आहेत आणि त्यांन रुग्णसेवेत रस नसून औषधं विकण्यात आणि पैसै कमावण्यात कसा रस आहे आहे यासंबंधी हे विधान आहे. लंडन येथील डॉक्टरांनी त्यांचा निषेध केला होता, येथील नाही. त्यावेळी येथील संघटनांनी आक्षेप घेतला नाही,” अशी विचारणा संजय राऊत यांनी केली आहे.

“जर कोणाचा गैरसमज झाला असेल तर तो दूर करावा. मी त्यांच्याशी बोलायला तयार आहे. माफी मागण्याआधी मी काय बोललो ते समजून घ्या. मी अपमानच केलेला नाही. माझी भूमिका जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रश्नावर होती. बोलण्याच्या ओघात एक शब्द येतो आणि त्यावर अशा पद्धतीने राजकारण होत आहे. हे होऊ नये असं मला वाटतं,” असं संजय राऊत यांनी म्हटलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुल गांधींनी मागितली सर्वोच्च न्यायालयाची बिनशर्त माफी

News Desk

कमलनाथ यांच्या सचिवांच्या घरासह तब्बल ५० ठिकाणी आयकर विभागाच्या धाडी

News Desk

#LokSabhaElections2019 : आज घराघरात “अबकी बार चौकीदार चोर है”च्या घोषणा !

News Desk