HW News Marathi
Covid-19

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानातील २ सुरक्षा रक्षक कोरोना पॉझिटिव्ह आल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, शरद पवार यांची देखील कोरोना चाचणी करण्यात आली आणि त्याचा अहवाल निगेटीव्ह आला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. काल (१६ ऑगस्ट) शरद पवार पत्नी प्रतिभा पवार यांच्यासह पुण्याला गेले होते.

सिल्व्हर ओक बंगल्यातील २ सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. हे दोघेही जण शरद पवारांच्या ताफ्यातील सुरक्षारक्षक असल्याची माहिती आहे. दरम्यान यांपैकी कुणीही शरद पवारांच्या संपर्कात नव्हते अशीही माहिती मिळत आहे.रॅपिड टेस्टमध्ये सिल्व्हर ओकवरील २ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. एकूण ६ जणांची चाचणी करण्यात आली होती. त्यांपैकी २ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनावर मात केल्यावर अशोक चव्हाण यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

News Desk

दिलासादायक ! महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट आता ८९.५३% वर  

News Desk

राज्यात सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, धुम्रपान केल्यास दंडासह शिक्षा ठोठावणार !

News Desk