HW Marathi
क्रीडा

बीसीसीआयकडून हार्दिक पंड्या-लोकेश राहुलवर निलंबनाची कारवाई

मुंबई | बीसीसीआयने पुन्हा एकदा आपण किती शिस्तबद्ध आहोत हे सिद्ध केले आहे. टीम इंडियाच्या अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि सलामीवीर फलंदाज केएल राहुल यांना ऑस्ट्रेलिया विरूध्दच्या पहिल्या वनडे सामन्यातून वगळण्यात आले आहे. ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये महिलांविरोधात आक्षेपार्ह टीका केल्यामुळे या दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणाची बीसीसीआयचे न्यायालय नियुक्त प्रशासकिय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी गंभीर दखल घेतली होती. याप्रकरणी दोघांवरही दोन सामन्यांची बंदी घालण्याविषयी विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले होते. यानंतर या दोघांनीही उद्या (१२ जानेवारी) ऑस्ट्रेलियात होण्याऱ्या पहिल्या समान्यातून वगळण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

 

Related posts

भारताने पाकविरूद्ध खेळावे की नाही, ते केंद्राला ठरवू दे !

News Desk

डॉ. रवींद्रकुमार सिंघल ठरले ‘आयर्नमॅन २०१८’

Gauri Tilekar

सईचे ‘कोल्हापुरी मावळे’

Gauri Tilekar