HW News Marathi
क्रीडा

अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाण, बीसीसीआयच्या उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी

नवी दिल्ली(वृत्तसंस्था): भारतीय क्रिकेट संघातून सध्या बाहेर असलेला अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाण, बीसीसीआयच्या उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळला आहे. याबद्दल बीसीसीआयने युसूफ पठाणला ५ महिन्यांच्या बंदीची शिक्षा सुनावली आहे.

गेल्या वर्षात युसूफ पठाणने तब्येत बिघडलेली असताना उपचारासाठी काही औषध घेतली होती. मात्र ही औषधे बीसीसीआयने घालून दिलेल्या नियमांमध्ये बसत नाही. अशा औषधांचे सेवन केल्यास ते उत्तेजक द्रव्यांचे सेवन मानले जाते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार युसूफने हे औषध घेतल्याचे समजतेय, मात्र हे औषध बीसीसीसीआयच्या नियमांमध्ये बसत नसल्याची कल्पना युसूफला नसल्याची माहिती त्याच्या जवळच्या नातेवाईकांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीतून पृथ्वी शॉची माघार

News Desk

महाराष्ट्र सरकारकडून नेमबाज राही सरनोबतला पगारच नाही

News Desk

मुंब्रा येथील व्हॉलीबॉल स्पर्धेत लखनऊ चा संघ विजेता

swarit