HW News Marathi
क्रीडा

आशियाई क्रीडा स्पर्धा २०१८ | सांघिक नौकानयनात भारताची सुवर्ण कामगिरी

पालेमबांग |आशियाई क्रीडा स्पर्धेत सांघिक नौकानयन प्रकारात भारताने सुवर्णपदक कमावले आहे. दत्तू भोकानल, ओम प्रकाश, स्वर्ण सिंह, सुखमीत सिंह यांनी या सांघिक नौकानयन प्रकारात ही सुवर्ण कामगिरी केली आहे. भारतीय संघाने 6:17:13 अशी दमदार खेळी करत यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील पाचवे सुवर्णपदक भारताला मिळवून दिले आहे.

याआधी भारताने सांघिक नौकानयन प्रकारात कांस्य पदक मिळवले होते. तर १६ वर्षाच्या सौरभ चौधरीने १० मीटर एअर पिस्टल स्पर्धेत आणि महाराष्ट्राच्या राही सरनोबतनेदेखील २५ मीटर एअर पिस्टल प्रकारात भारतासाठी चौथे सुवर्णपदक पटकावले होते. आशियाई क्रीडा स्पर्धेत बजरंग पुनियाने जकार्ता एशियाडमध्ये ६५ किलो फ्रीस्टाईल प्रकारात भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले तर भारताची कुस्तीपटू विनेश फोगट हीने जकार्ता एशियाडमध्ये सुवर्ण पदक पटकावून भारताला दुसरे सुवर्ण पदक मिळवून दिले.

विनेश फोगट ही एशियाडमध्ये सुवर्णपदक मिळवणारी पहिली महिला कुस्तीपटू ठरली आहे. नेमबाज दीपक आणि लक्ष्य यांनी भारताला दोन रौप्य पदके पटकावून दिली.

Related posts

Kargil Vijay Diwas : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘या’ २ संघात रंगणार फुटबॉल सामना

News Desk

महिला क्रीडापटूंच्या यादीत एडलवाईज ग्रुपकडून धावपटू हिमा दासचा समावेश

News Desk

दुखापतीमुळे राफेल नदालने सामना अर्ध्यावर सोडला

News Desk