जकार्ता | आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारताने एकूण तीन सुवर्ण पदके पटकावली आहेत. भारताच्या १६ वर्षाच्या नेमबाज सौरभ चौधरीने पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्टर नेमबाजीत भारतासाठी तिसरे सुवर्ण पदक पटकावले आहे. तर दुसरीकडे नेमबाज अभिषेक वर्मानेही कांस्यपदक पटकावले आहे. सौरभने विक्रमी कामगिरी करत २४०-७ गुण मिळवले तर अभिषेकने २०१९-३ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आपले स्थान निश्चित केले.
16-year-old #SaurabhChaudhary brings #TeamIndia its third Gold medal🥇at the #AsianGames2018. Saurabh shot a Games Record of 240.7 in the Finals of Men's 10m Air Pistol event where #AbhishekVerma also added another a Bronze 🥉for the country. #Congratulations boys!#IAmTeamIndia pic.twitter.com/7YXZxQQDTq
— Team India (@WeAreTeamIndia) August 21, 2018
आशियाई क्रीडा स्पर्धेत बजरंग पुनियाने जकार्ता एशियाडमध्ये ६५ किलो फ्रीस्टाईल प्रकारात भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. भारताची कुस्तीपटू विनेश फोगट हीने जकार्ता एशियाडमध्ये सुवर्ण पदक पटकावून भारताला दुसरे सुवर्ण पदक मिळवून दिले. विनेश फोगट ही एशियाडमध्ये सुवर्णपदक मिळवणारी पहिली महिला कुस्तीपटू ठरली आहे. नेमबाज दीपक आणि लक्ष्य यांनी भारताला दोन रौप्य पदके पटकावून दिली.
"We do not remember the days, we remember the moments."#ThankYou @BajrangPunia @apurvichandela #RaviKumar for the priceless #MomentsOfTheDay 🙏🥇🥉👏#IAmTeamIndia 🇮🇳 pic.twitter.com/AqqFl7iQgO
— Team India (@WeAreTeamIndia) August 19, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.