HW News Marathi
क्रीडा

#MeToo: बॅडमिंटन खेळाडू ज्वाला गट्टासोबत ही गैरवर्तन

मुंबई । तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्या वादानंतर #मीटू(#MeToo) ही मोहीम चर्चेत आली. अनेक क्षेत्रात काम करणाऱ्या महिला #मीटू(#MeToo)या मोहिमेद्वारे व्यक्त होऊ लागल्या. #मीटू या मोहिमेत आता भारतीय महिला खेळाडू देखील समोर येऊन आपली आपबिती सांगत आहेत. या मोहिमेत आता आंतराष्ट्रीय महिला बॅडमिंटनपटू ज्वाला गट्टा हिचे नाव आल्याने क्रीडा क्षेतात एकच खळबळ माजली आहे.

ज्वाला गट्टा तिच्यावर झालेल्या गैरवर्तनबद्दल तिने तिच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवर पोस्ट टाकून खुलासा केला आहे. त्या पोस्टमध्ये ज्वालाने तिच्यासोबत झालेल्या घटनाचा उल्लेख केला आही. ज्वालाने तिच्या ट्विटमध्ये म्हटले की, “संघटनेची अध्यक्ष झाल्यानंतर एका खेळाडूने माझ्यावर गैरवर्तन केल्याचे तिने सांगितले”.

“२००६ मध्ये तो व्यक्ती संघाचा प्रमुख होता. मी आंतराष्ट्रीय खेळाडू असून मला टीम मधून बाहेर काढण्यात आले. मी रियोला गेली होती. तिथून परत आल्यांनतर मला राष्ट्रीय टीममधून बाहेर टाकण्यात आले, कारण असे देण्यात आले की, मी खेळ स्वतःहून सोडला”. #मीटू(#MeToo) एका मोहिमेद्वारे ज्वाला गट्टाने तिच्यासोबत घडलेलाप्रकार अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून पोस्ट टाकून खुलासा केला आहे.

ज्वाला गट्टाचा परिचय

ज्वाला गट्टा हिचा जन्म ७ डिसेंबर १९८३ साली महाराष्ट्रातल्या वर्धा या गावात झाला आहे. ज्वाला ही १० वर्षाची असताना तिने बॅडमिंटन ट्रेनिंगला सुरुवात केली. १३ वर्षाची असताना तिला मिनी राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकली होती. १७ वर्षाच्या असताना जुनियर राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकली. ग्लासगोमध्ये आयोजित कॉमनवेल्थ गेम्स, २०१४ मध्ये ज्वाला गुट्टाने स्वर्ण पदक प्राप्त केले.ती आंतरराष्ट्रीय दर्जाची बॅडमिंटन खेळाडू होती.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारतीय चाहत्यांमुळेच तुला पगार मिळतो, बीसीसीआयने विराटला सुनावले

swarit

आयपीएल सट्टाप्रकरण, अरबाजला ठाणे पोलिसांचे समन्स

News Desk

बीसीसीआयकडून हार्दिक पंड्या-लोकेश राहुलवर निलंबनाची कारवाई

News Desk