HW News Marathi
देश / विदेश

काय आहे #MeToo कशी सुरुवात झाली, तुम्हाला माहित आहे का ?

#MeToo हा ट्रेंड सध्या खूप मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर ( ट्विटवर) व्हायरल होत आहे. भारतात #MeToo ही मोहीम तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्या वादानंतर परत चर्चेत आली आहे.

पहा काय आहे #MeToo

#MeToo या मोहिमेदरम्यान ज्या स्त्रियांसोबत लैंगिक शोषण झाले आहे. त्या स्त्रिया #मीटू मुळे जगासमोर व्यक्त होत आहेत. याआधी स्त्रियांना समाजासमोर व्यक्त होता येत नव्हते. परंतु #मीटू या मोहिमेमुळे स्त्रिया व्यक्त होत आहेत. समाजामध्ये कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लैंगिक शोषण केले जाते. #MeToo या मोहिमेच्या माध्यमातून सिनेसृष्टीतले कलाकार व्यक्त होत आहेत. तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्यातल्या वादानंतर, आता विकास बहल वादात सापडले आहेत. एका स्त्रीसोबत केलेल्या लैंगिक छळाचा त्यांच्यावर आरोप केला आह. #MeToo या मोहिमेमुळे लैंगिक शोषण करणाऱ्या पुरुषांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे. या मोहिमेमुळे स्त्रियांचे लैंगिक शोषण करणारे १०० वेळा विचार करतील. #मीटू ही मोहीम नवीन नाही, याआधी या मोहिमेची सुरवात हॉलिवूडमध्ये झाली होती.

 

#MeToo या मोहिमेची सुरुवात

#MeToo या शब्दाचा उल्लेख अमेरिकेतील सामाजिक कार्यकर्त्या तारना बुर्क यांनी केला होता. लैंगिक शोषण झालेल्या स्त्रियांसाठी त्यांनी ही मोहीम सुरु केली होती. तेव्हा एका तेरा वर्षाच्या मुलीसोबत बोलत असताना त्यांना कळाले, की त्या मुलींवर लैंगिक शोषण झाले आहे. बुर्क यांनी मायस्केप सोशल साईटवर #मीटू ला सुरुवात केली. लैंगिक अत्याचार झालेल्या स्त्रियांना MeToo च्या माध्यमातून एक व्यासपीठ मिळाले. मनात कोणतीही भीती न बाळगता त्या व्यक्त होत होत्या.

त्यानंतर काही काळाने हॉलिवूड मधली अभिनेत्री अलिसा मिलानो हिने #MeToo हि मोहिम ट्विटरद्वारे जगभर पसरवली. हार्व विस्टींग याने अलिसा मिलानोन वर लैंगिक अत्याचार केले होते.तिने हॉलिवूडमध्ये होणाऱ्या लैंगिक अत्याचाराला वाचा फोडली. तिने ट्विटर वरून स्त्रियांना जर तुम्हाला असा काही अनुभव आला असेल तर तुम्ही सुद्धा MeToo या हॅशटॅगचा वापर करा, असे आव्हान केले. या मोहिमेला खूप स्त्रियांनी प्रतिसाद दिला आहे.

भारतामध्ये मुनमुन दत्ता हिने #MeToo या मोहिमेला सुरुवात केली. त्यानंतर अनेक बॉलीवूड मधल्या अभिनेत्रींनी #MeToo हॅशटॅग वापरून व्यक्त झाल्या. त्यांनतर आता पुन्हा एकदा #MeToo मोहीमचा ट्विटरवर ट्रेण्ड सुरु झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सैन्याला ६ महिने लागतील तर संघ ३ दिवसांमध्ये लढण्यासाठी तयार होईल – मोहन भागवत

News Desk

Gujarat Election Result Live Updates : दिल्लीच्या भाजप कार्यालयात पंतप्रधान मोदी सायं. 6 वा. जाणार; कार्यकर्त्यांना संबोधित करणार

Aprna

नेतन्याहू यांनी पत्नी सारासह चरखा चालवला आणि पतंगही उडवली

swarit