HW News Marathi
क्रीडा

प्रशिक्षक रमेश पोवार यांचा ३ महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण

नवी दिल्ली | भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आलेल्या रमेश पोवार यांचा ३ महिन्यांचा कार्यकाळ शुक्रवारी (३० नोव्हेंबरला) संपला आहे. टी २० विश्वचषकासाठी ३ महिन्यांच्या कालावधीसाठी रमेश पोवार यांची निवड करण्यात आली होती. काहीच दिवसांपूर्वी भारतीय महिला क्रिकेट संघाची खेळाडू मिताली आणि रमेश पोवार यांच्यात मोठा वाद निर्माण झाला होता.

विश्वचषकाच्या इंग्लंडसोबतच्या सेमीफायनलमध्ये मिताली राज हिला बाहेर बसविण्यात आल्यामुळे हा वाद निर्माण झाला होता. त्यावेळी अहवालात प्रशिक्षक रमेश पोवार यांनी मिताली राजवर आपल्याला ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला होता. रमेश पोवार यांच्या या आरोपानंतर मिताली राजने प्रत्युत्तर देत “माझ्या जीवनातील हा काळा दिवस असून रमेश पोवार माझे करियर संपवण्याचा प्रयत्न करत आहेत”, असा आरोप देखील केला होता.

दरम्यान, रमेश पोवार यांच्याआधी प्रशिक्षकपदी असलेल्या तुषार आरोठे यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. महिला संघातील वरिष्ठ खेळाडूंसोबत मतभेद झाल्याचे कारण देत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Asian Games 2018 | आशियाई स्पर्धेत भारताला नेमबाजीत कांस्य पदक

swarit

कोहलीचा नवा विक्रम, सचिनला टाकले मागे

News Desk

‘संपर्क फॉर समर्थन’च्या अंतर्गत अमित शहांनी घेतली धोनीची भेट

News Desk
देश / विदेश

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे वयाच्या ९४व्या वर्षी निधन

News Desk

नवी दिल्ली | अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन झाले आहे. जॉर्ज हर्बर्ट वॉकर बुश हे ९४ वर्षांचे होते. ते अमेरिकेचे ४१वे राष्ट्राध्यक्ष होते. २० जानेवारी १९८९ ते २० जानेवारी १९९३ या कालखंडात जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली होती. जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांनी अमेरिकी प्रतिनिधिगृहात टेक्सास संस्थानाचे प्रतिनिधित्व केले होते.

 

Related posts

“आपका नाम है गुलाम इसलिए मैं करता हूं आपको सलाम”, रामदास आठवेंची गुलाम नबींसाठी कविता

News Desk

भारतावर पदकांचा वर्षाव ! पहिल्याच दिवशी ३ पदकं

News Desk

कोरोना व्हायरसशी लढण्यास भारत सज्ज

swarit