HW News Marathi
क्रीडा

दुखापतीमुळे राफेल नदालने सामना अर्ध्यावर सोडला

मेलबर्न | ऑस्ट्रेलियन ओपन या स्पर्धेत अव्वल टेनिसपटू राफेल नदालच्या पायाला दुखापतीमुळे सामना अर्ध्यावर सोडावा लागला. राफेलने सामना सोडल्यामुळे मरीन चिलिचला सहजरित्या स्पर्धेच्या उपांत्यफेरीत दाखल झाला. दुखापतीमुळे खेळणे नदालसाठी कठीण होत असल्यामुळे पाचव्या सेटनंतर २-० मध्ये सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला.

या सामनात नादालने ६-३ पहिला सेट जिंकला तर दुसरा सेट हा चिलिचने जिंकला. पाचव्या सेटपर्यंत हा सामना चांगला रंगला होता. परंतु, दुखापतीमुळे नदालने सामना सोडवा लागला होता. पण, नदाल आणि चिलिचने दोघांनी खेळाचे चांगले प्रदर्शन केले होते. ऑस्ट्रेलियन ओपनच्या चिलिचला अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी ब्रिटॉन इडमुंडचा पराभव करावा लागेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मणिपूरमधील शेतकऱ्याच्या मुलाने पटकावले पहिले सुवर्णपदक

Gauri Tilekar

क्रिकेट सामन्यादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू

News Desk

अजिंक्य रहाणेच्या कॅचची क्रिकेट विश्वात चर्चा

News Desk
महाराष्ट्र

ग्रामीण भागातील महिलांची ढाल

Adil

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने यंदा प्रथमच परिषदेत सर्वाधिक महिला प्रतिनीधींना प्रधान्य देण्यात आले आहे. या परिषदेत महिला अध्यक्ष आणि उपाध्यक्षांसह सात महिलांना सदस्य पद देण्यात आले असून यात महाराष्ट्रातुन माण तालुक्यातील म्हसवड, माणदेशी फाउंडेशनच्या अध्यक्ष चेतना सिन्हा यांनी सहअध्यक्षपद भूषविले आहे. चेतना सिन्हा यांनी ग्रामीण भागातील महिला सक्षमीकरण करण्यात मोलाचे योगदान दिले आहे.

ग्रामीण भागातील महिलांमधील कौशल्य आणि कलागुणांना वाव मिळावा म्हणून त्यांनी योग्यती संधी उपलब्ध करुन दिली आहे. सिन्हा यांनी गावागावातील महिलांना एकत्र करुन त्यांचे गुण समाजासमोर आण्याचा प्रयत्न केला. यासाठी सिन्हा यांनी जिल्ह्य आणि राष्ट्रीय स्तरावर या महिलांनी बनविलेल्या खाद्यपदार्थ, हातकाम आणि विणकामच्या वस्तूना बाजारपेठ उपलब्ध करुन दिली. तसेच ग्रामीण भागातील महिलांसाठी ‘माणदेशी महोत्सवा’चे आयोजन शहरी भागात केले जाते. जेणे करुन शहरी भागातील लोकांना ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडते. या महोत्सवात या महिलांनी बनविलेल्या सर्व वस्तू एकाच ठिकाणी लोकांना मिळतात. तसेच या माध्यमातून महिलांना उत्तम रोजगार देखील मिळतो. यामुळे ग्रामीण भागातील महिला स्वत:च्या पायावर उभी राहताना दिसत आहे.

‘या परिषदेत महिलांचे प्रश्न हाताळण्यावर जास्त भर देण्यात येणार असून नोकरदार महिलांना कामाच्या ठिकाणी मिळणारी वागणूक आणि मालमत्तेचा मालकी हक्क मिळावेत या दोन्ही मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. तसेच ‘इन्व्हेस्ट इंडिया’ याचा प्रचार देखील केला जाणार आहे. भारतात गुंतवणूक करण्यासाठी आताचा काळ योग्य असल्याचे चेतना सिन्हा यांनी सांगितले.’

या फोरमची स्थापना १९७१ मध्ये करण्यात आली असून जागतिक पातळीवरील नेते, वैज्ञानिक, उद्योगपती, सामाजिक संस्था या जागतिक समस्यांवर चर्चा करुन हे विविध उपक्रम आंतरराष्ट्रीय पातळीवर राबविण्याबाबत नियोजन करतात. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ४८ वी आर्थिक परिषद २३ ते २६ जानेवारी या कालावधीत स्वित्झर्लंडमधील दावोसा येथे सुरू होणार आहे. या परिषदेत संपूर्ण जगातील ७० देशांतील प्रमुख डब्ल्यूटीओ, आयएमएफ आणि विश्व बँकेसह प्रमुख आंतरराष्ट्रीय समुदायाचे ३८ मान्यवर व त्या देशातील मंत्री उपस्थित राहणार आहेत. तसेच भारतातील पंतप्रधान नरेंद्र मोदी, सहा केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशातील नामांकित कंपन्यांचे सीईओही परिषदेत सहभागी होणार आहे.

Related posts

डॉ. बाबासाहेबांनी दिलेले विचार आणि संविधानातच देशवासियांना पुढे घेऊन जाण्याची ताकद – अजित पवार

News Desk

“…तर मी कोणत्याही भ्रष्टाचाराला हात लावणार नाही”, संजय राऊतांचा किरीट सोमय्यांवर गंभीर आरोप

Aprna

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातलं हे सर्वात घाबरट सरकार  

News Desk