मॉस्को | फिफाच्या इतिहासात पुन्हा एकदा फ्रान्सने विजयी पताका लावली आहे. रविवारी फ्रान्सने २० वर्षांनंतर फिफा विश्वचषकावर आपले नाव कोरले. मॉस्को येथील ल्युझनिकी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात फ्रान्सने क्रोएशियाचा ४-२ असा पराभव केला. फ्रान्सची फिफा विश्वचषक जिंकण्याची ही दुसरी वेळ होती. फ्रान्सने यापूर्वी १९९८ मध्ये ब्राझिलचा ३-० असा धुव्वा उडवत विश्वचषक जिंकला होता. फ्रान्सचे विद्यमान प्रशिक्षक डिडियर डेशॉ यांच्याच नेतृत्वाखाली फ्रान्सने १९९८चा विश्वचषक जिंकला होता.
Putting an end to its 20-year-long wait, France won its second FIFA World Cup title after defeating Croatia 4-2 in a high-octane final at the Luzhniki Stadium in Moscow, Russia.
Read @ANI story | https://t.co/sLFfl4CBNj pic.twitter.com/Fh5JUiWewP
— ANI Digital (@ani_digital) July 15, 2018
२८व्या मिनिटाला फ्रान्सच्या गोलक्षेत्रात मुसंडी मारलेल्या इवान पेरिसिक याने अप्रतिम गोल करत क्रोएशियाला १-१ अशी बरोबरी साधून दिली. विशेष म्हणजे सलग तिसऱ्या सामन्यात क्रोएशियाने पिछाडीवरुन बरोबरी साधल्याने पुन्हा एकदा क्रोएशियन धक्कादायक निकाल लावणार अशी शक्यता निर्माण झाले. यामुळे फ्रान्सच्या पाठिराख्यांनाही अश्रू अनावर झाले होते.
परंतु, हुकमी खेळाडू ग्रीझमन याने फ्रान्सला मोठा दिलासा देताना पेनल्टी किक सत्कारणी लावली. फ्रान्सने क्रोएशियाच्या गोलक्षेत्रात धडक मारल्यानंतर चेंडू पेरिसिकच्या हाताला लागला. यावर रेफ्रींनी अपेक्षित निर्णय न दिल्याने फ्रान्सने ‘वार’ प्रणालीच्या जोरावर पेनल्टी मिळवली. ही संधी ग्रीझमनने ३८व्या मिनिटाला साधून फ्रान्सला २-० असे आघाडीवर नेले. ही आघाडी मध्यंतरापर्यंत कायम राखली.सामन्यात रंगत वाढत गेली आणि अखेर फ्रान्सने आपली आघाडी कायम ठेवत क्रोएशियावर ४-२ ने मात केली त्यामुळे २० वर्षांनी पुन्हा एकदा फ्रान्सचे विश्वचषकाचे स्वप्न पुर्ण झाले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.