HW News Marathi
क्रीडा

कॅप्टन कुलचा हा व्हिडिओ पाहिलात का ?

रांची | महेंद्रसिंग धोनी सध्या सुट्टीचा मनमुराद आनंद लुटत आहे. सध्या भारतीय संघ इंग्लंडमध्ये ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळत असल्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या धोनीला जवळपास दोन महिन्यांची सुट्टी मिळली आहे. कायमच आपल्या व्यस्त वेळापत्रकामुळे आपल्या खाजगी आयुष्याला धोनीला खूप कमी वेळ मिळतो. रांचीतील एका धबधब्याखाली धोनी चिंब भिजत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनीने गेली दहा वर्षे भारतीय क्रिकेटसाठी मोलाचे योगदान दिले. भारतीय संघाला विजय मिळवून देण्यासाठी धोनी नेहमी क्रियाशील असतो. संघाचे कर्णधार पद सोडल्यानंतर महेंद्रसिंग धोनी आपल्या आयुष्यातील आनंदाचे क्षण पुन्हा अनुभवत आहे. धोनीने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.इंस्टाग्रामवर शेअर केलल्या व्हिडिओमध्ये धोनी धबधब्याखाली उभे राहून, पाण्याशी खेळत असल्याचे दिसत आहे. रांचीतील या धबधब्यामुळे दहा वर्षापूर्वीच्या जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या, असे धोनीने म्हटले आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठमोळ्या सिद्धार्थने रचला इतिहास

Gauri Tilekar

फ्रेंच ओपनमध्ये राफेल नदालचं अकरावं विजेतेपद

News Desk

२० वर्षांनी फ्रान्सचे दुसरे जगज्जेतेपद, क्रोएशियावर फ्रान्सची ४-२ ने मात

News Desk