HW Marathi
क्रीडा

भारतीय संघाने धोनीला वगळले

पुणे । पहिल्या टी-२० वर्ल्ड कपवर भारताचे नाव कोरणाऱ्या आणि सर्वश्रेष्ठ ‘फिनिशर’च्या यादीत जाऊन बसलेल्या महेंद्रसिंग धोनीची टी-२० कारकीर्द शेवटच्या टप्प्यावर आल्याची चिन्हे दिसत आहेत. वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी निवडलेल्या भारतीय संघात धोनीला वगळले आहे. धोनीच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. अशातच, निवड समितीचे अध्यक्ष एम. एस. के प्रसाद यांनी, नव्या किपरचा शोध सुरू केल्याचे सांगितले जात आहे.

गेल्या काही महिन्यांपासून महेंद्रसिंग धोनी मैदानावर चाचपडताना-झगडताना दिसतोय. एशिया कपमध्ये धोनीला चार डावांत फक्त ७७ धावा करता आल्या होत्या. या वर्षातील दहा डावांमध्ये त्याची सरासरी अवघी २८.१२  इतकी आहे.  धोनीने आता थांबावे, अशी माहिती सूत्रांच्या साहाय्याने कळत आहे. दुसरीकडे, धोनी पर्वाची सांगता होणार की काय, अशी चर्चा ही सुरू झाली आहे. २०१९ च्या वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची बांधणी करण्याच्या दृष्टीने ही अदलाबदल केली जात आहे. कुणाला लॉटरी लागते, हे पाहणे महत्तवाचे ठरत आहे.

Related posts

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी रमेश पोवार यांची निवड

News Desk

मुंब्रा येथील व्हॉलीबॉल स्पर्धेत लखनऊ चा संघ विजेता

Ramdas Pandewad

सचिन तेंडुलकरने केली धोनीची पाठराखण

Shweta Khamkar