HW Marathi
क्रीडा

कोहलीचा नवा विक्रम, सचिनला टाकले मागे

लंडन | भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामधील चौथा कसोटी सामना साऊथम्पटन येथे सुरू आहे.  या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने २१व्या षटकात चौकार लगावून कसोटी क्रिकेटमध्ये सहा हजार धावाचा टप्पा पार केला आहे.

कोहलीने ११९ डावांमध्ये सहा हजार धावापुर्ण करून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ६ हजार धावांचा टप्पा पार करण्यासाठी १२० डाव लागले होते. भारताकडून सर्वांत वेगाने ६ हजार धावा करण्याचा विक्रम अजूनही लिटल मास्टर सुनिल गावसकर यांच्या नावावर अबाधित आहे. त्यांनी हा टप्पा ११७ डावांमध्ये पार केला होता. तर जागतिक स्तरावर वेगाने ६ हजार धावा पूर्ण करण्याचा भीम पराक्रम ऑस्ट्रेलियाच्या सर डोनाल्ड ब्रॅडमन यांच्या  नावावर आहे. त्यांनी फक्त ६८ डावांमध्ये ६ हजार धावांचा पल्ला गाठला होता.

Related posts

सचिन तेंडुलकर धोनीच्या मदतीला धावून आला

आयपीएल सट्टाप्रकरण, अरबाजला ठाणे पोलिसांचे समन्स

News Desk

टॉपलेस सेरेना विल्यम्स जेव्हा ब्रेस्ट कॅन्सर विषयी जनजागृती

अपर्णा गोतपागर