HW News Marathi
क्रीडा

मुंब्रा येथील व्हॉलीबॉल स्पर्धेत लखनऊ चा संघ विजेता

मुंबई : मुंब्रा स्पोर्टस क्लब तर्फे आयोजित अल्लामा शिबली नोमानी स्मृती व्हॉलीबॉल स्पर्धेत डायमंड स्पोर्टस क्लब लखनौ हा संघ विजेता ठरला तर फ्लाय स्पोर्टस क्लब, आझमगड उप विजेता ठरला. कौसा येथील अब्दुल्लाह रेसिडेन्सी येथे झालेल्या या स्पर्धेत देशभरातील आठ संघांनी सहभाग घेतला होता.

विजेत्या संघाला एक लाख रुपयांचे पहिले पारितोषिक तर उप विजेत्या संघाला साठ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. ज्येष्ठ समाजसेवक हाजी इत्तेफाक शेख व आमदार अबू आसिम आझमी यांच्या हस्ते व आयोजक शब्बीर खान, अझीम शेख, मेहफुज मामा यांच्या उपस्थितीत बक्षिस वितरण समारोह पार पडला. यावेळी नगरसेवक हिरा पाटील , बाबाजी पाटील, जफर नोमानी व मोठ्या संख्येने क्रीडा प्रेमी उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सायकल रॅली हे साहसाचे प्रतीक – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

News Desk

भारताची फुलराणी सायना नेहवाल हिच्या हाती भाजपचा झेंडा

swarit

‘सँटा’ सचिन तेंडुलकरची धमाल

News Desk