HW News Marathi
क्रीडा

आशिया चषकात भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

आशिया चषकात भारतीय संघाने पाकिस्तानवर 8 गडी राखून मात केली आहे.

दुबई इन्टरनॅशनल स्टेडियमवरच्या या सामन्यावर भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलं. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा अख्खा डाव सर्व बाद 162 असा गुंडाळला.भारताकडून केदार जाधव आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी तीन-तीन विकेटस काढून सर्वात प्रभावी मारा केला. जसप्रीत बुमराने दोन आणि कुलदीप यादवने एक विकेट काढली.भुवनेश्वरने गोलंदाजीची आक्रमक सुरुवात करत पाकिस्तानच्या सलामीवीर फलंदाजांना स्वस्तात माघारी धाडलं. जबरदस्त फॉर्मात असलेल्या फखर जमानला खातंही उघडता आलं नाही. त्यानंतर इतर गोलंदाजांनीही पाकिस्तानच्या फलंदाजांना जेरीस आणलं.डळमळीत झालेल्या पाकिस्तानला शोएब मलिक आणि बाबर आझम यांनी सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा हा प्रयत्न अगोदर कुलदीप यादव आणि नंतर केदार जाधवने हाणून पाडला.

अष्टपैलू हार्दिक पंड्याला मैदानात दुखापत

अठराव्या षटकातील अखेरचा चेंडू टाकताना पंड्याला पाठीमध्ये उसण भरली. ही दुखापत एवढी गंभीर स्वरुपाची दिसत होती की पंड्याला मैदानाबाहेर चालतही जाता आले नाही. त्यामुळे त्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले.

भारताचा विजयी संघ

रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, अंबाती रायुडू, केदार जाधव/दिनेश कार्तिक, महेंद्रसिंह धोनी, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, जस्प्रीत बुमरा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

क्रिकेटर आयुष झिमरेने घेतली आठवलेंची भेट

News Desk

‘सँटा’ सचिन तेंडुलकरची धमाल

News Desk

कराटे चॅम्पियनशिपमध्ये चिमुकल्या भार्गवी संखेची उत्कृष्ट कामगिरी

News Desk