Connect with us

क्रीडा

नुसती विधाने करण्यापेक्षा तुमच्या कामावर जास्त लक्ष द्या !

Gauri Tilekar

Published

on

नवी दिल्ली | “नुसती विधाने करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या कामावर जास्त लक्ष द्या”, असे बीसीसीआयमधील प्रशसकीय समितीने भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना सुनावले आहे. “भारतीय क्रिकेट संघ गेल्या पंधरा वर्षांमधील सर्वोत्तम संघ असेल”, असे इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी शास्त्री यांनी म्हटले होते. शास्त्री यांच्या या विधानावर सुनील गावस्कर आणि सौरव गांगुली यांनी सडकून टीका केली होती.

दरम्यान, भारतीय संघाला इंग्लंड दौऱ्यात मोठा पराभव पत्करावा लागला आहे. या पराभवानंतर संघाच्या माजी कर्णधारांकडून रवी शास्त्रींवर टीका मोठी टीका झाली. आता खुद्द बीसीसीआयनेच रवी शास्त्री यांना सुनावले आहे. “आता ऑस्ट्रेलिया दौरा आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाची कामगिरी कशी चांगली होईल. याकडे तुम्ही लक्ष देण्याची गरज आहे,” असेही बीसीसीआयने रवी शास्त्री यांना उद्देशून म्हटले आहे.

क्रीडा

Mumbai Marathon 2019 | मुख्य मॅरेथॉनच्या भारतीय गटात आर्मीचे नितेंद्र सिंग रावत विजयी

News Desk

Published

on

मुंबई | बहुचर्चित मुंबई मॅरेथॉनला आज (२० जानेवारी) सकाळी ७ वाजून २० मिनिटांनी सुरुवात झाली. भारताची महिला बॉक्सर मेरी कोमने फ्लॅग ऑफ केल्यानंतर पहिल्या ४२ किमी मॅरेथानला सुरुवात झाली. मुंबई मॅरेथॉनचा विजेता केनियाचा कॉसमन लॅगट हा ठरला आहे. तर महिला गटात इथियोपियाची अलेमू हिने हा विजेतेपद पटकाविले आहे. मुख्य मॅरेथॉनच्या भारतीय गटात आर्मीच्या नितेंद्र सिंग रावत तर भारतीय महिला गटात सुधा सिंह हे विजयी ठरले आहेत.

हाफ मॅरेथॉनच्या पुरुष गटात लष्कराच्या श्रीनू मुगाताने १ तास ५ मिनिटे आणि ४९ सेकंदांमध्ये ही शर्यत पूर्ण करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. महाराष्ट्राच्या कालिदास हिरवे याने हाफ मॅरेथॉनच्या पुरुष गटात तिसरा क्रमांक पटकावला. २१ किमीच्या हाफ मॅरेथॉनच्या महिला गटात रेल्वेच्या मीनू प्रजापती यांनी १ तास १८ मिनिटे आणि ५ सेकंदात ही शर्यत पूर्ण करत तर महाराष्ट्राच्या साईगीता नाईक हिने १ तास १९ मिनिटे आणि १ सेकंदात ही शर्यत पूर्ण करत दुसरा क्रमांक पटकाविला आहे.

हाफ मॅरेथॉनची सुरुवात वरळी सी-लिंकपासून होणार झाली होती. महालक्ष्मी रेस कोर्स-विल्सन कॉलेज-वानखडे स्टेडियम-आझाद मैदान असा या हाफ मॅरेथॉनचा मार्ग होता. मुख्य मॅरेथॉनचा मार्ग सीएसटी ते सीएसटी, व्हाया फ्लोरा फाउंटन-वानखेडे स्टेडियम-बाबूलनाथ मंदिर-जसलोक हॉस्पीटल – महालक्ष्मी-वरळी सी लिंक – माहिम चर्च – सिद्धिविनायक मंदिर – नेहरु सायन्स सेंटर – सीएसटी असा होता. या मुख्य मॅरेथॉनमध्ये देश-विदेशातील अनेक नामवंत धावपटू सहभागी झाले होते.

Continue Reading

क्रीडा

खार जिमखान्याने रद्द केले हार्दिक पंड्याचे मानद सदस्यत्व

News Desk

Published

on

मुंबई | कॉफी विथ करण या कार्यक्रमामध्ये महिलांवर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीमुळे अडचणीत आलेल्या भारतीय क्रिकेटर हार्दिक पंड्यासमोरील अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. चौकशी होईपर्यंत भारतीय संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्यानंतर आता मुंबईतील खार जिमखान्याने हार्दिक पंड्याचे मानद सदस्यत्व रद्द केले आहे. ऑक्टोबर २०१८ मध्ये खार जिमखान्याने हार्दिक पंड्याला तीन वर्षांसाठी मानद सदस्यत्व दिले होते.

‘सोशल मीडियावर आमचे चार हजार सदस्य असून हार्दिक पंड्या आणि त्याने केलेल्या वक्तव्यावर अनेकांनी आक्षेप नोंदवला होता. सदस्यांना आणि विशेषतः महिलांनी हार्दिक पंड्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यामुळे आमच्या व्यवस्थापकीय समितीने ऑक्टोबर महिन्यात देण्यात आलेलं तीन महिन्यांचं मानद सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेतला’, अशी माहिती खार जिमखान्याचे सहसचिव गौरव कपाडिया यांनी दिली आहे.

खार जिमखान्याने याआधी सचिन तेंडुलकर, लिअँडर पेस, महेश भुपती, सानिया मिर्झा, सायना नेहवाल यासारख्या खेळाडूंना खार जिमखान्याचे मानद सदस्यत्व बहाल केले आहे. याआधी हार्दिक पंड्याने जिलेट कंपनीसोबतचा करार गमावला आहे. हार्दिक पंड्याकडे एकूण सात स्पॉन्सरशिप करार असून हा वाद होण्याआधी त्याच्याकडे भारतीय क्रिकेट संघातील उद्योन्मुख खेळाडू म्हणून पाहिले जात होते. बीसीसीआयने कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर हार्दिक पंड्या आणि के एल राहुलने बिनशर्त माफी मागितली आहे.

या वादानंतर हार्दिक पंड्या आणि के एल राहुलला बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघारी बोलावलं. महत्त्वाचं म्हणजे २०१९ वर्ल्ड कपसाठी फक्त पाच महिने शिल्लक असून त्याच्या भविष्यावर टांगती तलवार आहे.

Continue Reading
Advertisement

HW Marathi Facebook

January 2019
M T W T F S S
« Dec    
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

महत्वाच्या बातम्या