HW Marathi
क्रीडा

पाकिस्तानसोबत न खेळून २ गुण देण्यापेक्षा मैदानात त्यांचा पराभव करा !

मुंबई | काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्‍या दहशतवादी हल्ल्यापासून देशभरात पाकिस्‍तान विरोधात निषेध व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकविरुद्ध खेळू नये असे भारतीय जनतेचे मत आहे. भारताने पाकिस्तानसोबत वर्ल्ड कपमध्ये खेळायचे की नाही, यावर सध्या राजकारण सुरू आहे. भारताने वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानसोबत न खेळून २ गुण मिळून देण्यापेक्षा खेळून त्यांचा पराभव करा, असे मत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी मांडले आहे.

“भारताने नेहमीच पाकिस्तानविरुद्ध चांगलीच कामगिरी केली आहे. आता पुन्हा एकदा भारताने मैदानात पाकिस्तानचा पराभूत करायला हवे. जर पाकिस्तानबरोबर आपण खेळलो नाही तर आपल्याकडून त्यांना दोन गुण मिळतील होतील. त्यामुळे मला तरी असे वाटते की आपण पाकिस्तानला दोन गुण देऊ नये. पण माझ्यासाठी देश जो निर्णय घेईल तोच योग्य असेल,” असे मत सचिनने मांडले आहे. “माझ्यासाठी कायम माझा देश सर्वात पहिला येतो. त्यामुळे माझा देश जो निर्णय घेईल त्याला माझा पाठिंबा असेल”, असे देखील सचिनने म्हणाले आहे.

 

 

Related posts

उसेन बोल्टचे व्यावसायिक फुटबॉल विश्वात पदार्पण

News Desk

अर्जुन पुरस्कार विजेत्यावर आईस्क्रीम विकण्याची वेळ

Gauri Tilekar

सेक्सच्या आवाजाने आवाजाने टेनिसकोर्ट थबकले

News Desk