HW News Marathi
क्रीडा

आचरेकरांनी दिलेला दम सचिन यांच्या कायम लक्षात राहिला

मुंबई | भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचे गुरू रमाकांत आचरेकर यांना पद्मश्री व द्रोणाचार्य या प्रतिष्ठत पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. आचरेकर यांचे आज (२ जानेवारी) मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. आचरेकर हे ८७ वर्षाचे होते.

ती शेवटची भेट ठरली

सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी नुकतीच एका क्रिकेट प्रशिक्षण वर्गाची सुरुवात केली होती. या नव्या इनिंगची सुरुवात आपले गुरू रमाकांत आचरेकरांचा आशीर्वाद घेऊन केली होती. या दोघांची आचरेकरांसोबतची ती शेवटची भेट ठरली. तेंडुलकर यांच्या कारकिर्दीत आचरेकरांचा सिंहाचा वाटा आहे.

गुरूनी दिलेला दम कायम लक्षात राहिल

शारदाश्रम शाळेच्या ज्युनिअर क्रिकेट संघाकडून खेळत असताना सचिन यांच्यासाठी प्रशिक्षक आचरेकर यांनी एका सराव सामन्याचे आयोजन केले होते. यावेळी सचिन यांचा सिनिअर संघ वानखेडे मैदानावर हॅरिस शिल्डचा सामना खेळत होता. त्यावेळी सचिन यांनी आचरेकरांचा आदेश धुडकावून लावला आणि ते सिनिअर संघाचा सामना बघायला वानखेडेवर गेले होते. यानंतर आचरेकरांनी दिलेला दम सचिन यांच्या कायम लक्षात राहिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जेष्ठ पत्रकार रजत शर्मा डीडीसीएचे नवे अध्यक्ष

News Desk

मुंबईकर शार्दुल ठाकूरची भारतीय क्रिकेट संघात निवड

News Desk

माजी हेविवेट चॅम्पियन माइक टायसन मुंबईत

News Desk