HW News Marathi
क्रीडा

सायना नेहवाल-पी.कश्यप अडकले विवाहबंधनात

मुंबई | भारतीय महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि भारतीय बॅडमिंटनपटू पी.कश्यप हे दोघेही आज (१४ डिसेंबर) विवाहबंधनात अडकले आहेत. सायना नेहवाल यांनी स्वतः बेस्ट ‘मॅच ऑफ माय लाईफ’ असे म्हणत ट्विटरद्वारे आपल्या लग्नाचे फोटोज शेअर करत ही बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे. गेल्या काही महिन्यांपासून हे दोघेही १६ डिसेंबरला विवाह करणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र, त्यांचा विवाह आज म्हणजेच १४ डिसेंबरला संपन्न झाला आहे.

सायना नेहवाल आणि पी.कश्यप यांच्या विवाहासाठी जवळच्या अशा खास १०० लोकांना आमंत्रण देण्यात आले होते. तसेच पाच दिवसांनी रिसेप्शन सोहळा पार पडणार आहे. दरम्यान, सायना आणि पी. कश्यप हे जवळपास गेल्या १० वर्षापासून एकमेकांना डेट करत होते. मात्र, त्या दोघांनीही आपल्या या नात्याबाबत कधीही अधिकृत घोषणा केली नव्हती. या दोघांच्या लग्नाची पत्रिका देखील सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विश्वविजेत्या महिला क्रिकेटपटूंचे अभिनंदन

Aprna

‘आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिन’ शिवाजी पार्कमध्ये साजरा होणार…

News Desk

भारतीय संघाने धोनीला वगळले

News Desk