HW News Marathi
क्रीडा

आयपीएल सट्टाप्रकरण, अरबाजला ठाणे पोलिसांचे समन्स

ठाणे | क्रिकेटच्या आयपीएल बेटिंगप्रकरणी बॉलीवुड अभिनेता अरबाज खानला ठाणे खंडणीविरोधी पथकाने समन्स बजावला आहे. हल्लीच काही दिवसांपूर्वी पोलिसांनी बुकी सोनू मालाडला अटक केली होती. सोनू मालाडकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. आयपीएलचे सामने सुरू झाल्यापासून पोलिसांची बुकींवर करडी नजर होती. बुकी आणि बॉलिवूडच्या काही अभिनेत्यांच्या संबंधांची चर्चा या आधीही झाली आहे.

चेन्नई सुपर किंग्सने वानखेडे स्टेडियमवर सनराइजर्स हैदराबादचा २७ मे रोजी ८ गडी राखून पराभव करत आयपीएलच्या अकराव्या हंगामाच्या जेतेपदावर आपले नाव कोरले. या विजयामुळे चेन्नई मालामाल झाली आहे एवढे नक्की. जगातली सर्वात महाग अशी क्रिकेट लीग म्हणून आयपीएलकडे पाहिले जाते. चेन्नईने जेतेपद पटकावून तब्बल २० कोटींचे बक्षीस मिळवीले आहे. गतवर्षी मुंबई इंडियन्सने १५ कोटींचे बक्षीस पटकावले होते. पण या वर्षी बक्षीसाच्या रक्कमेत ५ कोटीने वाढ झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विदर्भ संघाने दुसऱ्यांदा रणजी करंडकावर नाव कोरले

News Desk

डॉ. रवींद्रकुमार सिंघल ठरले ‘आयर्नमॅन २०१८’

Gauri Tilekar

भारतीय महिला संघाचे टी-२० वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत स्थान निश्चित

News Desk
मुंबई

परळ बसस्थानकात एसटीचा ७० वा वर्धापनदिन साजरा

News Desk

मुंबई | राज्य परिवहन मंडळाच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त रा. प. परळ बसस्थानकावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन किर्ती महाविद्यालयाचे उपप्राचार्य डि. व्ही. पवार, अध्यक्ष संजय सुपेकर, विभाग नियंत्रक रा. प. मुंबई विभाग प्रमुख पाहुणे अरुण विचारे, विभागीय वाहतूक अधिकारी , रा. प. मुंबई विभाग, रा.प.परळ आगाराचे व्यवस्थापक सचिन चाचरे यांच्या हस्ते झाले.

सदर कार्यक्रमाच्या वेळी उद्घाटक व अध्यक्ष यांनी प्रवाशांना जास्तीत जास्त एसटी बसने प्रवास करण्यासाठी प्रोत्साहन दिले. तसेच एसटी महामंडळाकडून प्रवाशांनी देण्यात येणा-या सुविधा व सवलत योजनांची माहिती दिली. तसेच रा.प. मंडळाच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त वातानुकुलित शिवशाही बसेसमध्ये ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी शिवशाही (आसन व्यवस्था ) बसमध्ये ४५ टक्के व शिवशाही (शयनयान ) बसमध्ये ३० टक्के भाड्यामध्ये सवलत देण्यात आली आहे.

वर्धापन दिनाचे औचित्य साधून आगारातील कर्मचा-यांसाठी यूनिकेअर हेल्थ सेंटर यांच्या वतीने मोफत आयुर्वेदिक वैद्यकिय चिकिस्ता शिबीर घेण्यात आले. तरी संपूर्ण कार्यक्रम उत्तम पार पाडण्यासाठी परळ आगाराचे यू.एम.मोरे, पी.एस बांद्रे, कृष्णदेव शिंदे, राजन येलवे, ए.ए. घाडी व सर्व कर्मचारी परळ आगार यांनी विषेश प्रयत्न केले.

Related posts

कपाडिया नगर परिसरातील पुलाचा भाग कोसळला

swarit

ऑटो रिक्षा व टॅक्सीची भाडेवाढ नाही, सर्वसामान्यांना दिलासा

News Desk

लालबागमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट २० जण जखमी

News Desk