HW News Marathi
क्रीडा

उसेन बोल्टचे व्यावसायिक फुटबॉल विश्वात पदार्पण

सिडनी | उसेन बोल्ट व्यावसायिक फुटबॉल विश्वात पदार्पण करणार आहे. वेगवान धावपटू अशी ओळख असलेल्या उसेन बोल्ट ने गतवर्षी अ‍ॅथ्लेटिक्सला अलविदा केले होते.

उसेन बोल्ट आता आॅस्ट्रेलियातील लीगमध्ये खेळणाऱ्या कोस्ट मायनर्स संघासोबत सराव करणार आहे. बोल्ट मँचेस्टर युनायटेडचा चाहता आहे. तो आतापर्यंत जर्मनी, नॉर्वे आणि द. आफ्रिकेतील अनेक संघांकडून खेळला आहे. आणि यापुढेही तो दीर्घकाळ खेळू इच्छित आहे.

उसेन बोल्ट च्या या पुनरागमनाचे वृत्त कोस्ट मायनर्सने स्वत:च्या वेबसाईटवरून प्रसारित केले आहे. त्यानुसार ‘क्लब आणि उसेन बोल्ट व्यावसायिक फुटबॉल कधीपर्यंत खेळत राहतील, याची शाश्वती नाही.’ उसेन बोल्टचे मात्र व्यावसायिक फुटबॉलचे स्वप्न साकारणार आहे. लीगचे सत्र आॅक्टोबरपासून सुरू होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजिंक्य रहाणेच्या कॅचची क्रिकेट विश्वात चर्चा

News Desk

मराठमोळ्या सिद्धार्थने रचला इतिहास

Gauri Tilekar

विदर्भ संघाने दुसऱ्यांदा रणजी करंडकावर नाव कोरले

News Desk